Join us

Yashasvi Jaiswal नवा 'सिक्सर किंग'! Brendon McCullum चा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

दहा वर्षांपासून अबाधित असलेला रेकॉर्ड मोडित काढत यशस्वी कसोटी क्रिकेटमधील नवा सिक्सर किंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 15:25 IST

Open in App

Yashasvi Jaiswal Breaks McCullum's World Record Of Hitting Most Sixes In Test : भारतीय संघातील युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने पर्थ कसोटी सामन्यात ब्रँडन मॅक्युलमचा वर्ल्ड रेकॉर्डला सुरुंग लावला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी नंबर वनवर पोहचला आहे. २०१४ मध्ये  न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलम याने कसोटीत एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक  ३३ षटकार मारत वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला होता.  दहा वर्षांपासून अबाधित असलेला रेकॉर्ड मोडित काढत यशस्वी कसोटी क्रिकेटमधील नवा सिक्सर किंग ठरलाय. 

यशस्वी जैस्वालनं मोडला मॅक्युलमचा वर्ल्ड रेकॉर्ड

यशस्वी जैस्वाल याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यात दुसरा षटकार मारताच कसोटीत एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला. यशस्वीनं १२ कसोटी सामन्यात ३४ षटकार आपल्या खात्यात जमा केले आहेत. 

वर्ल्ड रेकॉर्ड आणखी भक्कम करण्याचीही आहे संधी

यशस्वी जैस्वाल हा यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. एका डावात अपयशी ठरल्यावर तो लगेच कमबॅक करतो. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पर्थ कसोटीमध्येही त्याने आपल्यातील क्विक कमबॅकची ताकद दाखवून दिलीये.  पर्थ कसोटी सामन्यात त्याच्या भात्यातून निघलेल्या २ षटकारासह त्याच्या खात्यात आता २०२४ च्या कॅलेंडर ईयरमध्ये ३४ षटकारांची नोंद झाली आहे. तो यात आणखी किती षटकारांची भर घालणार? ते पाहण्याजोगे असेल. 

एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे आघाडीचे ३ फलंदाज

यशस्वी जैस्वाल (भारत) - ३४ * (२०२४)ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड)- ३३ (२०१४)बेन स्टोक्स (इंग्लंड)- २६ (२०२२)

यशस्वीनं  अल्पावधित सोडलीये विशेष छाप

यशस्वी जैस्वाल हा भारताकडून आतापर्यंत फक्त १५ कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्यातील २८ डावात त्याच्या खात्यात १४९७ धावा जमा आहेत. २१४ ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च खेळी आहे. त्याच्या भात्यातून ३ शतके ९ अर्धशतकांसह २ द्विशतकांचा समावेश आहे. पर्थ कसोटीत तो अर्धशतकाचे रुपांत शतकात करेल, असे दिसते.

टॅग्स :यशस्वी जैस्वालभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ