Join us

Sam Konstas खांदा मारणं Virat Kohli ला भोवणार? एका मॅचला बाकावर बसण्याची येऊ शकते वेळ!

आयसीसी या प्रकरणात दोन्ही खेळाडूंना बोलवणार हे जवळपास निश्चित आहे. जर विराट कोहली दोषी आढळला तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 13:37 IST

Open in App

 Virat Kohli likely to face one match ban after altercation with Sam Konstas : मेलबर्न बॉक्सिंग कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर सॅम कोन्स्टास यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरत आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावातील १० व्या षटाकानंतर या दोन खेळाडूंमध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. किंग कोहलीनं क्रिजवर जात ऑस्ट्रेलियाच्या युवा सलामीवीराला धक्का मारला. त्यानंतर सॅम कोन्स्टासही तावातावाने विराटच्या दिशेन आल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणात विराट कोहलीला मोठी किंमत मोजावी लागू शकते. आयसीसी या प्रकरणात दोन्ही खेळाडूंना बोलवणार हे जवळपास निश्चित आहे. जर विराट कोहली दोषी आढळला तर त्याच्यावर एका सामन्याच्या बंदीही कारवाईही केली जाऊ शकते. 

मैदानात काय घडलं?

मोहम्मद सिराजनं १० वे षटक पूर्ण केल्यावर सॅम कोन्स्टास दुसऱ्या एन्डला जात असताना कोहलीनं युवा क्रिकेटरच्या खांद्यावर खांदा मारला. त्यानंतर युवा खेळाडूनं कोहलीला काहीतरी म्हटलं. मग कोहली पुन्हा त्याच्या दिशेने आला. दोघांच्यातील वाद मिटवण्यासाठी मैदानातील पंच मायकल गफ यांच्यासह ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजानं मध्यस्थी केली. आयसीसी या प्रकरणाची चौकशी करणार असून जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई होऊ शकते. या प्रकरणात मॅच रेफ्री अँडी पाइक्राफ्ट काय निर्णय घेणार ते पाहण्याजोगे असेल. 

या प्रकरणात विराट कोहलीवर कोणती कारवाई होऊ शकते?

या प्रकरणात मॅच रेफ्रींनी विराट कोहलीला लेवल २ च्या अंतर्गत दोषी ठरवले तर त्याच्या खात्यात तीन किंवा चार डेमेरिट गुण जमा होऊ शकतात. ४ डेमेरिट पाइंटचा अर्थ एका सामन्याची बंदीचा सामना करण्याची वेळ येणे. या परिस्थितीत विराट कोहली सिडनी कसोटीला संघाबाहेर होऊ शकतो. या प्रकरणात लेवल १ अंतर्गत दोषी आढळल्यास फक्त मॅच फीमध्ये कपातीची कारवाई केली जाते.

गंभीरनं केला होता एका सामन्याच्या बंदीचा सामना

भारतीय संघाचा विद्यमान कोच गौतम गंभीर याने अशाच प्रकरणात एका सामन्याच्या बंदीचा सामना केला होता. २००८ मध्ये मोहालीच्या मैदानात गंभीरनं ऑस्ट्रेलियाचा ऑल राउंडर शेन वॉटसन याला खांदा मारला होता. या प्रकारानंतर गंभीरला एका कसोटीला मुकावे लागले होते. 

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया