AUS vs IND Captain Rohit Sharma Dropped Mid Series : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यात भारतीय संघातून रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. त्याच्या ऐवजी जसप्रीत बुमराह नाणेफेकीसाठी मैदानात आला. टीम इंडियाच्या वनडे आणि कसोटी संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मावर बाकावर बसण्याची वेळ आली. त्याने खरंच स्वत: हा निर्णय घेतला की, त्याला वगळण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटचा आहे, हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे. पण अशी नामुष्की ओढावणारा रोहित क्रिकेट जगतातील काही पहिला कॅप्टन नाही. याआधी एका भारतीय कर्णधारानं मालिकेदरम्यान तडकाफडकी राजीनामा दिल्याचे पाहायला मिळाले होते. कमालीचा योगायोग हा की तो दिग्गज क्रिकेटरही मुंबईकर होता.
पाकच्या कॅप्टन्सह मालिकेदरम्यान बाकावर बसणाऱ्या मोजक्या कर्णधाराच्या यादीत सामील झाला रोहित
आता एखादी मालिका सुरु असताना दुखापतीशिवाय खराब कामगिरीमुळे कॅप्टन प्लेइंग इलेव्हनचा भाग नसणं हे क्रिकेटच्या इतिहासात भलेही नवं नसेल. पण टीम इंडियात आधी असं कधीच घडलं नाही. याआधीही एका मुंबईकरासोबतच हा सीन घडला होता. याधीच्या प्रकरणात भारतीय दिग्गजाने थेट निवृत्ती घेतल्याचा किस्सा घडला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यात बाकावर बसताच रोहित शर्मा पाकच्या माजी कॅप्टनसह मालिकेदरम्यान प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसणाऱ्या काही खेळाडूंच्या यादीत सामील झालाय. एक नजर टाकुयात यासंदर्भातील खास स्टोरीवर
क्रिकेट इतिहासात प्लेइंग इलेव्हन बाहेर बसण्याची वेळ आलेले कर्णधार
क्रिकेटच्या इतिहासात १९७४ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अॅशेस यांच्यातील कसोटी मालिकेत इंग्लंडच्या माइक डेनिस बाकावर बसण्याचा निर्णय घेतला होता. या दिग्गजाच्या जागी जॉन एडरिचनं संघाचे नेतृत्व केल्याचे पाहायला मिळाले होते. या यादीत पाकिस्तानच्या मिसबाह उल हकचाही समावेश आहे. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनमधून स्व:ला आउट झाला होता. याच वर्षी म्हणजे २०१४ साली श्रीलंकन संघाता तत्कालीन कर्णधार दिनेश चंडीमलनं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीसह तीन सामने बाकावर बसला. त्याच्या जागी लसिथ मलिंकाने संघाची कॅप्टन्सी केली होती. या यादीत आता रोहित शर्माचाही समावेश झाला आहे.
रोहित आधी या मुंबईकरानं घेतला होता धक्कादायक निर्णय
रोहित शर्माआधी टीम इंडियाच्या कॅप्टन्सी करताना आणखी एका दिग्गजाने धक्कादायक निर्णय घेतल्याचा किस्सा आहे. १९५८-५९ मध्ये वेस्ट इंडिजच्या मालिकेदरम्यान पॉली उमरीगर यांनी टोकाचा निर्णय घेतला होता. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष रतिभाई पटेल यांनी गुजरातच्या जासूचा समावेश करण्याचा आग्रह केल्यावर उमरीगर यांनी कसोटी सामन्याच्या दिवशी सकाळी राजीनामा दिल्याची घटना घडली होती. माजी क्रिकेट प्रशासक आणि क्रिकेट स्तंभ लेखक मकरंद वायंगणकर यांनी एक्स अकाउंटवरून यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे.
Web Title: AUS vs IND Captain Rohit Sharma Dropped Mid Series He 2nd Indian And Mumbaikar After Polly Umrigar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.