Team India Day-Night Test Match Record : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पर्थ कसोटी सामन्यात टीम इंडियाने अगदी तोऱ्यात विजय नोंदवला. कार्यवाहू कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं २९५ धावांसह विजय नोंदवत ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियासमोर एक नवं चॅलेंज असणार आहे.
३६ च्या आकड्याशिवाय कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड
६ डिसेंबर पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना अॅडलेडच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. हा सामना पिंक बॉलवर अर्थात दिवस रात्र असा खेळवला जाणार आहे. डे नाईट कसोटी, भारत अन् ऑस्ट्रेलिया हे समीकरण जुन्या भयावह आठवणीला उजाळा देणारे आहे. कारण ऑस्ट्रेलियातील डे नाईट कसोटीतच भारतीय संघ ३६ धावांत आटोपला होता. त्यामुळे अनेकांना धास्तीही वाटू शकते. आता यासामन्यानंत मालिका आपण जिंकली होती हे सर्वांनाच माहितीये. पण टीम इंडियानं आतापर्यंत किती डे नाईट कसोटी सामने खेळले आहेत? ३६ च्या आकड्याशिवाय कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड ते आपण जाणून घेऊयात. भारतीय संघानं कधी अन् कुणाविरुद्ध खेळला पहिला दिवस रात्र सामना भारतीय संघानं आपला पहिला दिवस रात्र कसोटी सामना २०१९ मध्ये घरच्या मैदानात खेळला होता. ईडन गार्डन्सच्या मैदानात बांगलादेश विरुद्ध रंगलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात भारतीय संघाने ४६ धावांनी विजय नोंदवला होता. ईशांत शर्मा या सामन्यात सर्वाधिक ९ विकेट्स घेत सामनावीर ठरला होता.
दुसरी पिंक बॉल टेस्ट
२०२० च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने अॅडलेडच्या मैदानातील पिंक बॉल टेस्टसह कसोटी मालिकेची सुरुवात केली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर या सामन्यात ३६ धावांत ऑल आउट होण्याची वेळ आली होती. हा सामना भारतीय संघाने गमावला होता. पण त्यानंतर जबरदस्त कमबॅक करत अजिंक्य राहणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसोटी मालिका जिंकली होती.
तिसरा सामना इंग्लंड विरुद्ध
भारतीय संघाने तिसरी डे नाईट टेस्ट मॅच २०१२१ मध्ये इंग्लंड विरुद्ध अहमदाबादच्या मैदानात खेळली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा सामना १० विकेट्स राखून जिंकला होता. या कसोटी सामन्यात बापू अर्थात अक्षर पटेलचा जलवा पाहायला मिळाला होता. त्याने ११ विकेट्स घेतल्या होत्या. मग चौथ्या सामन्यातही मिळाला विजय
२०२२ मध्ये टीम इंडियाने अखेरचा दिवस रात्र कसोटी सामना हा श्रीलंके विरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारतीय संगाने २३८ धावांनी दमदार विजय नोंदवला होता.