Join us

बुमराहच्या कॅप्टन्सीत या दोघांना मिळू शकते पदार्पणाची संधी; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

बुमराह पुन्हा कॅप्टन्सी करताना दिसणार; जाणून घ्या पर्थ कसोटीसाठी कशी असू शकेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:18 IST

Open in App

Team India Predicted Playing 11 Perth Test, BGT :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी होणाऱ्या   कसोटी मालिकेसाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. पहिल्यांदाच या स्पर्धेतील कसोटी मालिकेत ५ सामने खेळवण्यात येणार आहेत. पर्थच्या मैदानातून भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या मालिकेआधी भारतीय संघावर एका मागून एक संकटे आल्याचे पाहायला मिळत आहे. 

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चॅलेंजिग मालिका, कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन?

रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार यासंदर्भातील चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होती. त्यात शुबमन गिलच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन काय असेल? हा मुद्दा आता चर्चेत आला आहे. एक नजर टाकुयात रोहित आणि शुबमन गिलच्या अनुपस्थितीत कुणाला मिळेल संधी अन् कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन? यासंदर्भातील स्टोरी

जसप्रीत बुमराहच्या कॅप्टन्सीत दोन नव्या चेहऱ्यांना मिळू शकते संधी 

पर्थ कसोटी सामन्याआधी भारतीय संघानं जोरदार सराव केला. पण सराव सामन्यावेळी भारतीय संघाला एका पाठोपाठ एक धक्के बसले. सर्फराजन खान, विराट कोहली, लोकेश राहुल आणि शुबमन गिल दुखापतग्रस्त झाले. यातील बहुतांश मंडळींची दुखापत ही किरकोळ असल्यामुळे टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला. पण त्याचबरोबर शुबमन गिल खेळणार नसल्याचा मोठा धक्काही बसला. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रोहित शर्मासह शुबमन गिल पर्थ कसोटीसाठी उपलब्ध नसेल. या परिस्थितीत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियात दोन नव्या चेहऱ्यांची एन्ट्री पक्की मानली जात आहे.

कोण बजावणार सलामीवीराची जबाबदारी?

पर्थ कसोटी सामन्यात रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या डावाची सुरुवात नवी जोडी करणार हे फिक्स आहे. यशस्वी जैस्वालसोबत लोकेश राहुल सलामीवीराच्या रुपात दिसेल, अशी चर्चा आहे. याआधी त्याने भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली आहे. गौतम गंभीर यांनी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याआधीच त्यासंदर्भातील हिंट दिली होती. दुखापतीतून सावरुन त्याने सरावही केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तोच पर्थच्या मैदानात टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.

शुबमन गिलच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी

पर्थ कसोटीसाठी शुबमन गिलच्या जागी अभिमन्यू ईश्वरन याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. याआधीही तो टीम इंडियाच्या ताफ्यासोबत दिसला आहे. पण त्याला पदार्पणाची संधी काही मिळालेली नव्हती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याचे आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाचे स्वप्न साकार होऊ शकते. मध्यफळीत विराट कोहली, रिषभ पंतसोबत जुरेल ध्रुवलाही पसंती दिली जाईल. ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या सामन्यात जुरेल ध्रुव याने आपली खास छाप सोडली होती. पर्थ कसोटी सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळू शकते. 

लोअर ऑर्डरमध्ये दिसू शकतो दुसरा नवा चेहरा

पर्थ कसोटी सामन्यात अष्टपैलूच्या रुपात रवींद्र जडेजावर पुन्हा एकदा भरवसा दाखवला जाऊ शकतो. त्याच्या जोडीला हर्षित राणाला पदार्पणाची संधी मिळू शकते. जलदगती गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, आकाशदीप आणि मोहम्मद सिराज या मंडळींचे स्थान जवळपास पक्के आहे.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघजसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीशुभमन गिललोकेश राहुल