AUS vs IND : रोहितचा हा निर्णय म्हणजे लागला तर 'मटका' नाहीतर 'फटका' असाच, कारण...

चौथ्या कसोटी सामन्यात बॅटिंग ऑर्डरमील बदलाचा प्रयोग रोहितसह टीम इंडियासाठी ठरू शकतो धोक्याचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 19:48 IST2024-12-25T19:48:10+5:302024-12-25T19:48:58+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs IND BGT 2024-25 Know About 3 Reasons why Rohit Sharma Opening in Melbourne 4th Test Could be wrong move For Team India And Him Self | AUS vs IND : रोहितचा हा निर्णय म्हणजे लागला तर 'मटका' नाहीतर 'फटका' असाच, कारण...

AUS vs IND : रोहितचा हा निर्णय म्हणजे लागला तर 'मटका' नाहीतर 'फटका' असाच, कारण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Why Rohit Sharma Opening in 4th Test Could be Wrong Move For Team India Know Reasons : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील चौथा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानात रंगणार आहे. पहिल्या तीन सामन्यानंतर  भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघ ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ असे बरोबरीत आहेत. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा यशस्वी जैस्वालसोबत भारतीय संघाच्या डावाला सुरुवात करताना दिसू शकतो. हा निर्णय म्हणजे लागला तर 'मटका' नाहीतर बसणार 'फटका' असाच काहीसा ठरू शकतो. जाणून घेऊयात त्यामागची काही कारणं...

लोकेश राहुलला मिळाली बढती; मिडल लोअर ऑर्डरमध्येही फ्लॉप ठरला रोहित

रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या पर्थ कसोटी सामन्याला मुकला होता. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलनं भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. त्याने डावाची सुरुवात करताना दमदार कामगिरीही करून दाखवली. त्यामुळे रोहित दुसऱ्या कसोटीसाठी संघात परतल्यावरही लोकेश राहुलच ओपनिंग करताना दिसून आले. दुसरीकडे रोहित शर्मानं सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली. ज्या क्रमांकावरून त्याने कसोटी करिअरची सुरुवात केली त्या क्रमांकावरील रेकॉर्ड उत्तम असताना रोहित शर्माला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. ३ डावात त्याने फक्त १९ धावा केल्या.  त्यानंतर आता चौथ्या कसोटीत रोहित पुन्हा ओपनिंगला दिसू शकतो. पण त्याचा हा निर्णय चुकीचाही ठरू शकतो.

रोहित शर्माचा खराब फॉर्म

रोहित शर्मा हा क्लास खेळाडू आहे, पण सध्या फॉर्म त्याला साथ देताना दिसत नाही. मागील ७ रलोची सामन्यात त्याने १२ पेक्षा कमी सरासरीने धावा केल्या आहेत. दुसऱ्या बाजूला डावाची सुरुवात करताना लोकेश राहुलनं आव्हानात्मक खेळपट्टीवर आपलं नाणं खणखणीत असल्याचे दाखवून दिले आहे. या परिस्थितीत रोहितनं सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणं त्याच्यासह टीम इंडियाच्या हिताचे ठरेल. तो ओपनिंगला आला अन् त्याचा फ्लॉप शो कायम राहिला तर त्याच्यासह टीम इंडियाही गोत्यात येऊ शकते.

बॅटिंग ऑर्डरमधील एका बदलामुळे सर्वांची होईल गोची 

रोहित शर्मा पुन्हा ओपनिंगला आला तर फक्त लोकेश राहुलची जागा बदलणार नाही तर त्याचा परिणाम अन्य फलंदाजांच्या बॅटिंग ऑर्डरवर देखील होईल. लोकेश राहुलला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा डाव आखला तर नियमित या क्रमांकावर खेळणाऱ्या शुबमन गिलवर सहाव्या क्रमांकावर खेळण्याची वेळ येईल. जे त्याच्यासाठी सहज सोपे नसेल. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत आघाडीच्या फलंदाजांमुळेच टीम इंडिया अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले आहे. या परिस्थितीत बॅटिंग ऑर्डरमधील बदल हा टीम इंडियाचे टेन्शन वाढवणारा ठरू शकतो.

रोहित शर्माची ऑस्ट्रेलियातील ओपनिंग करतावेळीची कामगिरी

ऑस्ट्रेलियातील रोहित शर्माचा ओपनिंगचा रेकॉर्ड फार काही खास नाही. ९ कसोटी सामन्यात त्याने २६.६८ च्या सरासरीनं धावा काढल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानात रोहितची सर्वोत्तम कामगिरीही सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करताना पाहायला मिळाली आहे. नव्या चेंडूवर मिळणारा स्विंग रोहितसाठी डोकेदुखी ठरतोय. त्यामुळे ओपनिंगच्या तुलनेत सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करणं हेच त्याच्यासाठी एकदम सेफ आहे. 
 
 

 

Web Title: AUS vs IND BGT 2024-25 Know About 3 Reasons why Rohit Sharma Opening in Melbourne 4th Test Could be wrong move For Team India And Him Self

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.