Australia vs India, 2nd Test : पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघानं अॅडिलेडचं मैदान मारत दिवस रात्र कसोटी सामन्यातील आपली बादशाहत कायम राखली आहे. भारतीय संघाला तिसऱ्या दिवशीच पराभूत करत ऑस्ट्रेलियानं ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. नितीश रेड्डीनं केलेल्या ४२ धावांच्या खेळीमुळे टीम इंडियावर डावाने पराभूत होण्याची नामुष्की टळली.
टीम इंडियानं ८१ षटकात गमावल्या २० विकेट्स
पहिल्या डावात भारतीय संघाला १८० धावांत आटोपल्यावर ऑस्ट्रेलिया संघाने ट्रॅविस हेडच्या शतकी खेळीच्या जारोवर ३३७ धावा करत १५७ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात भारतीय संघ कमबॅक करेल, अशी आशा होती. पण आघाडीच्या फलंदाजांना मैदानात तग धरता आला नाही. परिणामी टीम इंडियाचा दुसरा डाव १७५ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाला फक्त १९ धाावांचे लक्ष्य मिळाले होते. जे त्यांनी १० विकेट्स राखूप पार करत तिसऱ्या दिवशीच कसोटी संपवली. भारतीय संघानं या सामन्यात दोन्ही डावात मिळून ८१ षटकात २० विकेट्स गमावल्या. नितिशकुमार रेड्डी दोन्ही डावात संघाकडून सर्वाधिक धावा केल्या.