IND vs AUS : पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडिया 'नापास'; ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवशीच मारलं अ‍ॅडिलेडचं मैदान

ऑस्ट्रेलियानं ५ सामन्यांच्या मालिकेत साधली १-१ अशी बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 11:18 IST2024-12-08T11:16:39+5:302024-12-08T11:18:49+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs IND 2nd Test Pat Cummins Lead Australia won by 10 wkts Adelaide Oval Pink Ball Test And Level Border Gavaskar Trophy 5 Match Test Series Nitish Reddy Top Scored For India Both Innings | IND vs AUS : पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडिया 'नापास'; ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवशीच मारलं अ‍ॅडिलेडचं मैदान

IND vs AUS : पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडिया 'नापास'; ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवशीच मारलं अ‍ॅडिलेडचं मैदान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Australia vs India, 2nd Test : पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघानं अ‍ॅडिलेडचं मैदान मारत दिवस रात्र कसोटी सामन्यातील आपली बादशाहत कायम राखली आहे. भारतीय संघाला तिसऱ्या दिवशीच पराभूत करत ऑस्ट्रेलियानं ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. नितीश रेड्डीनं केलेल्या ४२ धावांच्या खेळीमुळे टीम इंडियावर डावाने पराभूत होण्याची नामुष्की टळली.  

टीम इंडियानं ८१ षटकात गमावल्या २० विकेट्स

पहिल्या डावात भारतीय संघाला १८० धावांत आटोपल्यावर ऑस्ट्रेलिया संघाने ट्रॅविस हेडच्या शतकी खेळीच्या जारोवर ३३७ धावा करत १५७ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात भारतीय संघ कमबॅक करेल, अशी आशा होती. पण आघाडीच्या फलंदाजांना मैदानात तग धरता आला नाही. परिणामी टीम इंडियाचा दुसरा डाव १७५ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाला फक्त १९ धाावांचे लक्ष्य मिळाले होते. जे त्यांनी १० विकेट्स राखूप पार करत तिसऱ्या दिवशीच कसोटी संपवली. भारतीय संघानं या सामन्यात दोन्ही डावात मिळून ८१ षटकात २० विकेट्स गमावल्या. नितिशकुमार रेड्डी दोन्ही डावात संघाकडून सर्वाधिक धावा केल्या.  
 

 

 

Web Title: AUS vs IND 2nd Test Pat Cummins Lead Australia won by 10 wkts Adelaide Oval Pink Ball Test And Level Border Gavaskar Trophy 5 Match Test Series Nitish Reddy Top Scored For India Both Innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.