किंग कोहलीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात ही 'ये रे माझ्या मागल्या... या गाण्यानं केलीये. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाचा कार्यवाहू कर्णधार जसप्रीत बुमराहनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन विकेट्स १४ धावांवर पडल्यावर किंग कोहली मैदानात आला. तो लयीतही दिसला. पण खराब फॉर्म पुन्हा त्याच्या अडवा आलाच. जोश हेजलवूडच्या गोंलादीजीवर क्रिजच्या बाहेर येऊन खेळण्याचा त्याचा डाव फसला. जोश हेजलवूडनं टाकलेल्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर तो झेलबाद झाला.
हेजलवूडनं अतिरिक्त बाउन्सवर साधला डाव; किंग कोहलीच्या विकेटस्ह टीम इंडियाला मोठा घाव
जोश हेझलवूडच्या बाउन्सरला थोपवण्यासाठी विराट कोहलीनं पुढे येऊन खेळण्याचा जो प्रयत्न केला तो सपशेल फसला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने आधीच्या टप्प्यावर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू टाकत विराटला आपल्या जाळ्यात अडकवले. स्लिपमध्ये उस्मान ख्वाजानं कोणतीही चूक न करता विराटचा झेल टिपला. कोहली अवघ्या ५ धावा करून तंबूत परतला.
किंग कोहलीच्या अपयशाची मालिका सुरुच
विराट कोहली हा गेल्या काही सामन्यात धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. मागील १० डावात कोहली ९ वेळा अपयशी ठरला होता. त्यात आता आणखी एका डावाची भर पडली आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटीत सामन्यात त्याने फक्त ९९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड विरुद्धच्या तीन कसोटी सामन्यात त्याला ९३ धावा करता आल्या. ही आकडेवारी कोहली विराट संघर्ष करत असल्याचा पुरावाच आहे.
या वर्षातील आकडेवारीतर अगदी क्षुल्लक अन् लाजिरवाणी
कसोटी क्रिकेटमध्ये कोहली सातत्याने अपयशी ठरताना दिसतोय. २०२० नंतर ६० कसोटी डावांत त्याने फक्त दोन शतके आणि 11 अर्धशतके झळकावली आहेत. या वर्षातही त्याला आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश करता आलेला नाही. पर्थ कसोटीतील पहिल्या डावातील ५ धावांसह यंदाच्या वर्षात त्याने६ कसोटीसामन्यात २२.७२ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत.