Join us

पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव

पाकला पराभूत केल्यावर काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 01:01 IST

Open in App

Suryakumar Yadav Says Dedicate Today’s Win To Armed Forces And... आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने दिमाखदार विजय नोंदवला. दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात बर्थडे बॉय आणि टीम इंडियाचा  कर्णधार सूर्यकुमार यादव याने षटकार मारत संघाच्या विजयावर शिक्का मोर्तब केला. कर्णधारानं टॉस पासून ते अगदी मॅच संपेपर्यंत पहलगाम येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीयांमधील संवेदनशील गोष्ट लक्षात ठेवून त्याचं भान जपल्याचे पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मॅचनंतर काय म्हणाला भारतीय कर्णधार?

एवढेच नाही तर पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारानं पहलगाम हल्ल्यातील पीडितांसोबत असल्याचे सांगत हा विजय भारतीय  सैन्यदलाला समर्पित केला. मॅचनंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, "आम्ही पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबायांसोबत उभे आहोत. हा विजय आमच्या सर्व शस्त्रदलांना समर्पित करायचा आहे. ज्यांनी खूप धैर्य दाखवले. तेच आमचे प्रेरणास्थान आहेत." 

IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश

BCCI नं पाक विरुद्ध खेळण्याचं कारण स्पष्ट करताना सरकारच्या परवानगीचाही दिला होता दाखला

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताकडून प्रत्युत्तरादाखल ऑपरेशन सिंदूरअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमुळे भारत-पाक यांच्यात पुन्हा एकदा तणापूर्ण वातावर निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा, अशी मागणी करण्यात आली होती. पण आशिया चषक स्पर्धा ही बहुदेशीय स्पर्धा असल्यामुळे  मैत्रीपूर्ण संबंध नसलेल्या संघाविरुद्धही बहिष्कार टाकता येणार नाही. सरकारच्या परवानगीनंतर आशिया चषक स्पर्धेत पाक विरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका  बीसीसीआयने सामन्याआधी स्पष्ट केली होती. भारतीय संघ पाकविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरला, पण जे काही घडलं ते सर्व लक्षात ठेवूनच संघातील प्रत्येक खेळाडू मैदानात वावरल्याचे दिसून आले.

टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपभारत विरुद्ध पाकिस्तानसूर्यकुमार यादवभारतीय क्रिकेट संघपहलगाम दहशतवादी हल्ला