Asia Cup 2025 Super Four Live Streaming And Schedule Full Fixtures Of Team India And Other Teams : आशिया चषक २०२५ स्पर्धेतील भारत आणि ओमान यांच्यातील साखळी फेरीतील अखेरच्या लढती आधीच श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील लढतीनंतर सुपर फोरचं चित्र स्पष्ट झालं आहे. 'अ' गटातून भारत आणि पाकिस्तान या दोन संघांनी आधीच पुढच्या फेरीत प्रवेश केला होता. आता श्रीलंकेच्या संघानं सलग तिसऱ्या विजयासह आपल्या गटात अव्वल राहून सुपर फोरमध्ये एन्ट्री मारलीये. एवढेच नाही तर त्यांच्या विजयासह बांगलादेशचाही सुपर फोरचा मार्ग मोकळा झालाय. इथं एक नजर टाकुयात Super Four कोणता संघ कधी अन् कुणाविरुद्ध भिडणार त्यासंदर्भातील सविस्तर....
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सुपर फोरमध्ये प्रत्येक संघ एकेमकांना भिडणार!
भारतीय संघ १९ सप्टेंबरला ओमान विरुद्ध साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळणार आहे. या सामन्यातील विजयासह टीम इंडिया आपल्या ग्रुपमध्ये टॉपला राहिल. या गटात पाकिस्तान संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. 'ब' गटातून श्रीलंका आणि बांगलादेश संघ आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्यासाठी मैदानात उतरतील. सुपर फोरमध्ये प्रत्येक संघ एकमेकांसोबत प्रत्येकी एक सामना खेळणार आहे. यातील आघाडीचे दोन संघ २८ सप्टेंबरला फायनल खेळतील.
कुठं पाहता येतील आशिया कप स्पर्धेतील सुपर फोरमधील लढतीय़ (Asia Cup 2025 Super Four Matches Live Streaming And Telecast)
भारतात आशिया चषक स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रेक्षपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून करण्यात येत आहे. टेलिव्हिजनवरील सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर वेगवेगळ्या भाषेतील समालोचनासह क्रिकेट चाहते सुपर फोरमधील लढतींचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय मोबाईलच्या माध्यमातून SonyLiv अॅप आणि वेबसाईटवर स्ट्रिमिंगसह फॅनकोडवरही या सामन्याचा थरार पाहता येईल.
आशिया कप २०२५ स्पर्धेतील सुपर फोरच्या लढतीचे वेळापत्रक
दिनांक | सामना | स्थळ | वेळ (GMT) | वेळ (स्थानिक) |
---|---|---|---|---|
१९ सप्टेंबर, शुक्र | भारत vs ओमान, सामना १२ (ग्रुप A) | शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी | २:३० PM | रात्री ८:०० |
शनिवार, २० सप्टेंबर | श्रीलंका vs बांगलादेश, सुपर फोर सामना १ (B1 vs B2) | दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई | २:३० PM | रात्री ८:०० |
रविवार, २१ सप्टेंबर | भारत vs पाकिस्तान, सुपर फोर सामना २ (A1 vs A2) | दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई | २:३० PM | रात्री ८:०० |
मंगळवार २३ सप्टेंबर | पाकिस्तान vs श्रीलंका, सुपर फोर सामना ३ (A2 vs B1) | शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी | २:३० PM | रात्री ८:०० |
बुधवार २४ सप्टेंबर | भारत vs बांगलादेश, सुपर फोर सामना ४ (A1 vs B2) | दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई | २:३० PM | रात्री ८:०० |
गुरुवार २५ सप्टेंबर | पाकिस्तान vs बांगलादेश, सुपर फोर सामना ५ (A2 vs B2) | दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई | २:३० PM | रात्री ८:०० |
शुक्रवार २६ सप्टेंबर | भारत vs श्रीलंका, सुपर फोर सामना ६ (A1 vs B1) | दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई | २:३० PM | रात्री ८:०० |
रविवार २८ सप्टेंबर | TBC vs TBC, FINAL | दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई | २:३० PM | रात्री ८:०० |