Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

Asia Cup 2025 Super Four Live Streaming And Schedule Full Fixtures : आशिया कप २०२५ स्पर्धेतील सुपर फोरच्या लढतींचे संपूर्ण वेळापत्रक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 00:48 IST2025-09-19T00:24:53+5:302025-09-19T00:48:59+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 Super Four Schedule Full Fixtures Of Team India vs Pakistan Sri Lanka And Bangladesh Matches Dates And Timings Live Streaming And More | Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2025 Super Four Live Streaming And Schedule Full Fixtures Of Team India And Other Teams : आशिया चषक २०२५ स्पर्धेतील भारत आणि ओमान यांच्यातील साखळी फेरीतील अखेरच्या लढती आधीच श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील लढतीनंतर सुपर फोरचं चित्र स्पष्ट झालं आहे. 'अ' गटातून भारत आणि पाकिस्तान या दोन संघांनी आधीच पुढच्या फेरीत प्रवेश केला होता. आता श्रीलंकेच्या संघानं सलग तिसऱ्या विजयासह आपल्या गटात अव्वल राहून सुपर फोरमध्ये एन्ट्री मारलीये. एवढेच नाही तर त्यांच्या विजयासह बांगलादेशचाही सुपर फोरचा मार्ग मोकळा झालाय. इथं एक नजर टाकुयात Super Four कोणता संघ कधी अन् कुणाविरुद्ध भिडणार त्यासंदर्भातील सविस्तर....

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सुपर फोरमध्ये प्रत्येक संघ एकेमकांना भिडणार!

भारतीय संघ १९ सप्टेंबरला ओमान विरुद्ध साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळणार आहे. या सामन्यातील विजयासह टीम इंडिया आपल्या ग्रुपमध्ये टॉपला राहिल. या गटात पाकिस्तान संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. 'ब' गटातून श्रीलंका आणि बांगलादेश संघ आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्यासाठी मैदानात उतरतील. सुपर फोरमध्ये प्रत्येक संघ एकमेकांसोबत प्रत्येकी एक सामना खेळणार आहे. यातील आघाडीचे दोन संघ २८ सप्टेंबरला फायनल खेळतील. 

 कुठं पाहता येतील आशिया कप स्पर्धेतील सुपर फोरमधील लढतीय़ (Asia Cup 2025 Super Four Matches Live Streaming And Telecast)

भारतात आशिया चषक स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रेक्षपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून करण्यात येत आहे. टेलिव्हिजनवरील सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर वेगवेगळ्या भाषेतील समालोचनासह क्रिकेट चाहते सुपर फोरमधील लढतींचा आनंद घेऊ शकतात.  याशिवाय मोबाईलच्या माध्यमातून  SonyLiv अ‍ॅप आणि वेबसाईटवर स्ट्रिमिंगसह फॅनकोडवरही या सामन्याचा थरार पाहता येईल.
 

आशिया कप २०२५ स्पर्धेतील सुपर फोरच्या लढतीचे वेळापत्रक  

दिनांकसामनास्थळवेळ (GMT)वेळ (स्थानिक)
१९ सप्टेंबर, शुक्रभारत vs ओमान, सामना १२ (ग्रुप A)शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी२:३० PMरात्री ८:००
शनिवार, २० सप्टेंबरश्रीलंका vs बांगलादेश, सुपर फोर सामना १ (B1 vs B2)दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई२:३० PMरात्री ८:००
रविवार, २१ सप्टेंबरभारत vs पाकिस्तान, सुपर फोर सामना २ (A1 vs A2)दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई२:३० PMरात्री ८:००
मंगळवार २३ सप्टेंबर पाकिस्तान vs श्रीलंका, सुपर फोर सामना ३ (A2 vs B1)शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी२:३० PMरात्री ८:००
बुधवार २४ सप्टेंबर भारत vs बांगलादेश, सुपर फोर सामना ४ (A1 vs B2)दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई२:३० PMरात्री ८:००
गुरुवार २५ सप्टेंबर पाकिस्तान vs बांगलादेश, सुपर फोर सामना ५ (A2 vs B2)दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई२:३० PMरात्री ८:००
शुक्रवार २६ सप्टेंबर भारत vs श्रीलंका, सुपर फोर सामना ६ (A1 vs B1)दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई२:३० PMरात्री ८:००
रविवार २८ सप्टेंबर TBC vs TBC, FINALदुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई२:३० PMरात्री ८:००

Web Title: Asia Cup 2025 Super Four Schedule Full Fixtures Of Team India vs Pakistan Sri Lanka And Bangladesh Matches Dates And Timings Live Streaming And More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.