Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

संघ अडचणीत असताना मोहम्मद नबीची वादळी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 22:09 IST2025-09-18T22:07:27+5:302025-09-18T22:09:13+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 SL vs AFG Mohammad Nabi Fastest Fifty for Afghanistan With 5 Sixes In The Last Over When Afghanistan Was Trouble Against Sri Lanka | Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2025 SL vs AFG Mohammad Nabi Fastest Fifty for Afghanistan With 5 Sixes : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ अडचणीत असताना अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबीनं कमालीच्या बॅटिंगचा नजराणा पेश केला. अखेरच्या षटकात सलग पाच षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. अफगाणिस्तानच्या संघाकडून आंतरारष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावे केला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

युवीचा विक्रमाची बरोबरी करण्याची होती संधी, पण...

एवढेच नाही तर या षटकात तो भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगचा रेकॉर्डची बरोबरी करतोय की, काय असे वाटत होते. पण शेवटच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्यात अपयशी ठरला अन् युवीचा विक्रम थोडक्यात वाचला. नबीला  या डावात एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रमी डाव साधणं शक्य झालं नसलं तरी त्याची ही इनिंग अफगाणिस्तानच्या संघाला सुपर फोरमध्ये घेऊन जाण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आहे. 

२२ वर्षाच्या पोराला धु धु धुतलं! 

मोहम्मद नबीनं आधी पहिल्यंदा फलंदाजी करताना कोलमडलेला डाव सावरताना कर्णधार राशिद खानसोबत उपयुक्त भागीदारी रचली. १९ षटकानंतर अफगाणिस्तानच्या धावफलाकवर १३७ धावा होत्या. श्रीलंकेकडून २२ वर्षीय दुनिथ वेल्लालागे (Dunith Wellalage) अखेरचं षटक घेऊन आला. या षटकात ४० वर्षीय नबी अक्षरश: तुटून पडला. या षटकात सलग पाच षटकार मारत त्याने संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. नबीनं याच षटकात षटकार मारत २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अफगाणिस्तानकडून संयुक्तरित्या हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. या षटकात नबीच्या वादळी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानच्या संघाने ३२ धावांसह संघाच्या धावफलकावर ८ विकेट्सच्या मोबदल्यावर १६९ धावा लावल्या. नबीनं या सामन्यात २२ चेंडूत ६० धावा कुटल्या.

अफगाणिस्तानकडून टी२०आय सामन्यांमध्ये सर्वात जलद अर्धशतके

  • २० चेंडू – अझमतुल्लाह ओमरझई विरुद्ध हाँगकाँग, अबू धाबी, २०२५

  • २० चेंडू – मोहम्मद नबी विरुद्ध श्रीलंका, अबू धाबी, २०२५

  • २१ चेंडू – मोहम्मद नबी विरुद्ध आयर्लंड, ग्रेटर नोएडा, २०१७

  • २१ चेंडू – गुलबदीन नाईब विरुद्ध भारत, बेंगळुरू, २०२४

Web Title: Asia Cup 2025 SL vs AFG Mohammad Nabi Fastest Fifty for Afghanistan With 5 Sixes In The Last Over When Afghanistan Was Trouble Against Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.