Asia Cup 2025 Prize Money : यूएईतील अबुधाबीच्या मैदानातून आशिया कप स्पर्धेच्या १७ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यातील लढतीआधी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफीचे अवारण केले. यावेळी स्पर्धेत सहभागी सर्व संघातील कर्णधारही उपस्थितीत होते. सर्व कर्णधारांचे खास फोटो सेशनही झाले.
विजेत्यासह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळणार?
यंदाच्या हंगामात ८ संघ आशिया कप स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. साखळी फेरीतील सामने हे दोन वेगवेगळ्या गटात होणार आहेत. यातील प्रत्येक गटातील आघाडीचे संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील. या चार संघातून फायनल कोण खेळणार अन् जेतेपद कोण पटकवणार? ही गोष्ट चर्चेत असताना विजेत्यासह उप विजेत्याला मिळणाऱ्या बक्षीस रक्कमेसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे.
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
याआधी किती मिळाले होते बक्षीस?
२०२२ मध्ये आशिया कप टी-२० स्पर्धेतील विजेत्या श्रीलंकन संघाला जवळपास १.६ कोटी एवढे बक्षीस मिळाले होते. उपविजेत्या पाकिस्तान संघाला ७९.६६ लाख रुपये एवढे बक्षीस देण्यात आले होते. तिसऱ्या आणि चौथ्य क्रमांकावरील संघांना अनुक्रमे ५३ लाख आणि ३९ लाख एवढे बक्षीस मिळाले होते. या बक्षीसाच्या तुलनेत यावेळी अधिक बक्षीस देण्याच्या निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेनं घेतला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गत विजेताही आता कोट्यवधीत खेळणार
पीटीआयच्या वृत्तानुसार, यंदाच्या हंगामातील स्पर्धेत विजेत्याला दिणाऱ्या बक्षीस १ कोटी रुपयांनी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या विजेत्याला २.६ कोटी एवढे बक्षीस दिले जाईल. या निर्णयामुळे उपविजेत्या संघाला मिळाणारी बक्षीसाची रक्कमही कोट्यवधीच्या घरात पोहचेल. त्यांना १.३ कोटी एवढे बक्षीस मिळेल. आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप टी-२० स्पर्धेतील बक्षीस रक्कम वाढवण्यात आल्याचे समजते.