Pakistan Cricketer On Suryakumar Yadav And Team India : आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघापाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली. या स्पर्धेत भारत-पाक यांच्यात रंगणाऱ्या सामन्यासंदर्भात चर्चा सुरु असताना पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरनं विराट कोहली आणि रोहित शर्माच्या खांद्यावरून टीम इंडियाच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यावर निशाणा साधला आहे. आशिया कपसाठी भारतीय संघाने निवडलेल्या संघातील उणीवा काढत पाक क्रिकेटरनं सूर्यकुमार यादव अन् टीम इंडियासाठी आशिया कप स्पर्धा आव्हानात्मक असल्याचे म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियासंदर्भात पाकचा माजी क्रिकेटर नेमकं काय म्हणाला?
माजी क्रिकेटर बाजीद खान याने पीटीव्ही स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत भारतीय संघाबद्दल म्हणाला की, 'संघात सर्व उच्च स्तरिय खेळाडू आहेत. संघातील खेळाडूंच्या क्षमतेवर शंका घेऊ शकत नाही. पण विराट कोहली आणि रोहित शर्मा ही दोघे ज्याप्रमाणे टीम इंडियात ऊर्जा भरत होते, त्याची उणीव नक्कीच भासेल.
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
पाकविरुद्ध सूर्या ठरलाय फिका
बाजीद खान याने यावेळी भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यावरही निशाणा साधलाय. सूर्यकुमार यादव याने जवळपास सर्व संघाविरुद्ध धावा केल्या आहेत. पण पाकिस्तान विरुद्ध तो फिका ठरलाय. जलदगती गोलंदाजांचे आक्रमण असो किंवा त्यामागे आणखी काही कारण असो, पण तो पाक विरुद्ध संघर्ष करताना दिसला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यानं आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध ५ सामने खेळले आहेत. यात त्याने १२.८० च्या सरासरीसह फक्त ६४ धावा केल्या आहेत.
टीम इंडियाला या खेळाडूचीही उणीव भासेल
विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय भारतीय संघाला रवींद्र जडेजाचीही उणीव भासणार आहे. अक्षर पटेलच्या रुपात टीम इंडियात त्याच्या जागी उत्तम खेळाडू मिळाला आहे. पण जडेजा हा टीम इंडियातील संतुलन कायम ठेवण्यात सर्वोत्तम पर्याय होता. त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियासमोर एक वेगळे आव्हान असेल, असे मतही पाकच्या माजी क्रिकेटरनं व्यक्त केले आहे.