Asia Cup 2025 आशिया चषक स्पर्धेतील दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात रंगलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात यूएईच्या ताफ्यातून भारतीय वंशाच्या सिमरनजीत सिंगनं (Simranjeet Singh) आपल्या फिरकीची जादू दाखवून देत मैफिल लुटली. भारतीय मैदानात तयार झालेल्या पंजाबी पठ्ठ्यानं पाकिस्तानच्या ताफ्यातील फलंदाजांची फिरकी घेत दुबईत 'सिंग इज किंग' शो दाखवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्धशतकवीर फखर झमानसह हसन नवाझ अन् खुशदील शाहला दाखवला तंबूचा रस्ता
सुपर फोरसाठी 'करो वा मरो'ची लढत असलेल्या सामन्यात सिमरनजीत सिंगनं ४ षटकांच्या कोट्यात ३ महत्त्वपूर्ण विकेट घेताना फक्त २६ धावा खर्च केल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील त्याची तशी ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. पण पाकिस्तान विरुद्धची ही कामिगिरी एक नंबरपेक्षा भारी ठरते. सिमरनजीतनं फखर झमानच्या रुपात पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का दिला. त्याने ३६ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने संघाकडून सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. यासह हसन नवाझ ३ (४) आणि खुशदील शाह ४ (३) हे बॅटरही त्याच्या फिरकीच्या जाळ्यात फसले.
पंजाबमध्ये शुबमन गिलसोबत करायचा नेट प्रॅक्टिस! २० दिवसांसाठी दुबईला गेला अन् तो UAE चा झाला
कोण आहे सिमरनजीत सिंग? ज्यानं पाक विरुद्ध केला भांगडा!
यूएईच्या ताफ्यातील ३५ वर्षीय डावखुरा फिरकीपटू हा मूळचा भारतीय आहे. पंजाबमधील मोहालीच्या PCA अकादमीत त्याने क्रिकेटचे धडे घेतले आहेत. टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिल ११-१२ वर्षांचा असताना हा फिरकीपटू नेटमध्ये त्याला गोलंदाजी करायचा. पंजाबमधील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत चमक दाखवल्यावर रणजी ट्रॉफी स्पर्धेतील संभाव्य खेळाडूंच्या यादीतही त्याचे नाव आले होते. एका क्रिकेट कॅम्पच्या निमित्ताने तो दुबईला गेला अन् इथंच मुक्का ठोकत तो आता UAE च्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनीधीत्व करताना दिसतोय.
एक नजर त्याच्या टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीवर
सिमरनजीत सिंगनं २०२४ मध्ये दुबईच्या मैदानातच कतारविरुद्धच्या सामन्यात १५ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरी आहे. आता पाकिस्तान विरुद्ध त्याने २६ धावा खर्च करत ३ विकेट्स घेत लक्षवेधून घेतलं आहे. कुवेत विरुद्ध त्याने १७ धावा खर्च करत २ विकेट्स तर सौदी अरेबियाविरुद्ध दोन वेळा २० धावा खर्च करून त्याने २ विकेट्सचा डाव साधला आहे. आतापर्यंतच्या १४ T20I लढतीत त्याच्या खात्या१८ विकेट्स जमा आहेत.