इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ आशिया कप स्पर्धेच्या तयारीला लागलाय. ९ सप्टेंबरपासून युएईतील दुबई आणि अबूधाबीच्या मैदानात या स्पर्धेतील सामना खेळवण्यात येणार आहेत. आशियातील किंगडम कायम ठेवण्यासाठी BCCI निवडकर्ते कशी संघ बांधणी करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात टी-२० संघात कोण खेळणार अन् कुणाचा पत्ता कट होणार यासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल. याआधी आता एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन्ही स्टार टी-२० संघात कमबॅकसाठी सज्ज
इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडचा मुद्दा चांगलाच गाजला. पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याआधी त्याला संघातून रिलीजही करण्यात आले होते. त्यामुळे तो आशिया कप स्पर्धेचा भाग असणार का? असाही एक प्रश्न चर्चेत होता. याशिवाय मागील काही मालिकेत भारतीय संघ शुबमन गिलशिवायच मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. मोठ्या स्पर्धेसाठी हे दोन्ही स्टार टी-२० संघात कमबॅक करण्यास सज्ज आहेत.
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
कसोटी कर्णधाराला मिळणार उप कर्णधारपदाची जबाबदारी?
पीटीआयच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह आशिया कप स्पर्धेत खेळताना दिसू शकतो. याशिवाय शुबमन गिल फक्त कमबॅक करणार नाही तर तो उप कर्णधार पदाच्या शर्यतीत आहे. सध्याच्या घडीला सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील संघात अक्षर पटेलकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी आहे. कसोटी कर्णधार त्याची जागा घेणार असल्याचा दावा पीटीआयने आपल्या वृत्तामध्ये केलाय.
कधी होणार भारतीय संघाची निवड?
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील BCCI निवड समिती १९ किंवा २० ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा करू शकते. सेंटर ऑफ एक्सीलेंसच्या स्पोर्ट्स सायन्स टीमकडून खेळाडूंसदर्भातील फिटनेस अहवाल आल्यावर भारतीय संघ निवडीचा मार्ग मोकळा होईल. टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव फिट असेल अन् तोच संघाचे नेतृत्व करताना दिसेल, असेही बोलले जाते.
या गड्यांचे स्थान जवळपास फिक्स!
अभिषेक शर्मा हा आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. आशिया कप स्पर्धेसाठी त्याचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे. याशिवाय संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या फलंदाजीची प्रमुख मदार असेल. संजू सॅमसन हा विकेट किपर बॅटरच्या रुपात पहिली पसंती असेल. दुसऱ्या विकेट किपरच्या रुपात जितेश शर्मा अन् ध्रुव जुरेल यांच्यात टक्कर असेल. शिवम दुबेसह अक्षर पटेल आणि वॉशिंग्ट सुंदर अष्टपैलू खेळाडूंच्या रुपात संघात दिसू शकतात.