Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?

आशिया कप स्पर्धेला सुरुवात होण्याआधी गौतम गंभीर अन् 'लकी चार्म' ही गोष्ट चर्चेचा विषय ठरताना दिसतीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:10 IST2025-09-09T12:22:06+5:302025-09-09T13:10:49+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 Indian Cricket Team head coach Gautam Gambhir Spotted With KKR Lucky Bag Dubai Ahead Of India vs UAE Match | Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?

Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाने कसून सराव सुरु केला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १० सप्टेंबरला यूएई विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या टी-२० फॉरमॅटमधील आशिया कप स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाची बादशाहत आणि सध्याच्या घडीला टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीचा आलेख पाहता टीम इंडियाच स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानली जात आहे. आशिया कप स्पर्धेला सुरुवात होण्याआधी गौतम गंभीर अन् 'लकी चार्म' ही गोष्ट चर्चेचा विषय ठरताना दिसतीये.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

टीम इंडियाच्या कोच KKR ची बॅग घेऊन पोहचलाय दुबईला, सोशल मीडियावर रंगली चर्चा

आशिया कप स्पर्धेला सुरुवात होण्याआधी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर चर्चेत आलाय. दुबईतील ICC अकादमीच्या मैदानात टीम इंडियाचा कोच KKR चा लोगो असणारी बॅग घेऊन स्पॉट झाला. ही नुसती एक बॅग आहे की, 'लक फॅक्टर' अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागलीये. यामागचं कारण असं की, गंभीर हा टीम इंडियाचा कोच होण्यापूर्वी IPL मधील शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार अन् मेंटॉर राहिला आहे. गंभीर जी बॅग घेऊन दुबईला पोहचलाय त्याचं  कनेक्शन हे IPL २०२४ च्या हंगामातील केकेआरच्या जेतेपदाशी आहे. ही बॅक केकेआरला लकी ठरली अन् आता आशिया कप स्पर्धेत टीम इंडियालाही या लक फॅक्टरचा फायदा होईल, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळते. 

Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ डाव साधणार?

भारताच्या यजमानपदाखाली ८ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत यूएईतील अबुधाबी आणि दुबईतील मैदानात आशिया कप स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धत ८ संघ सहभगी असून आगामी टी-२० वर्ल्ड कपची ही एक रंगीत तालीमच असेल. भारतीय संघाने या स्पर्धेत सर्वाधिक ८ वेळा जेतेपद पटकावले असून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नवव्या वेळी ट्रॉफी उंचावत हा विक्रम आणखी मजबूत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. टीम इंडियाशिवाय श्रीलंकेनं ६ वेळा ही स्पर्धा जिंकली असून पाकिस्तानने दोन वेळा ही स्पर्धा गाजवली आहे.

आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीतील भारतीय संघाचे सामने

  • १० सप्टेंबर- भारत विरुद्ध यूएई
  • १४ सप्टेंबर- भारत विरुद्ध पाकिस्तान
  • १९  सप्टेंबर-भारत विरुद्ध ओमान
     

आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जितेश शर्मा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

Web Title: Asia Cup 2025 Indian Cricket Team head coach Gautam Gambhir Spotted With KKR Lucky Bag Dubai Ahead Of India vs UAE Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.