Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

जे बुमराहला जमल नाही ते करून दाखवलं, पण तरीही पुन्हा बाकावरच बसण्याची येऊ शकते वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 01:28 IST2025-09-20T01:25:37+5:302025-09-20T01:28:16+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 India vs Oman 12th Match Arshdeep Singh Became First Indian Bowler To Take 100 Wickets In T20Is | Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Arshdeep Singh Became First Indian Bowler To Take 100 Wickets :आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात बाकावर बसलेल्या अर्शदीप सिंगला ओमान विरुद्धच्या सामन्यात पहिली संधी मिळाली. या सामन्यात एक विकेट आपल्या खात्यात जमा करताच त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात शंभर विकेट्सचा पल्ला गाठणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २० गोलंदाजांनी शंभर विकेट्सचा डाव साधला आहे. यात न्यूझीलंडचा टीम साउदी १२६ सामन्यातील १६४ विकेट्ससह सर्वात अव्वलस्थानावर आहे. अर्शदीप सिंग आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १०० विकेट्स घेणारा २१ वा गोलंदाज ठरलाय. 

जे बुमराहला जमल नाही ते करून दाखवलं, पण तरीही पुन्हा बाकावरच बसण्याची येऊ शकते वेळ

ओमान विरुद्धच्या सामन्यात विनायक शुक्ला याच्या रुपात अर्शदीपनं शंभरावी शिकार केली. बदली खेळाडूच्या रुपात मैदानात उतरलेल्या रिंकू सिंह याने ओमानच्या फलंदाजाचा झेल पकडला. अर्शदीप सिंग याने ६३ व्या सामन्यात शंभरीला गवसणी घातली आहे. सध्याच्या घडीला क्रिकेट जगतात तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वात घातक गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहला जे  ७० सामन्यात जमलं नाही ते अर्शदीपनं त्याच्यापेक्षा ७ सामने कमी खेळून करून दाखवलंय. पण या कामगिरीनंतरही त्याला सुपर फोरमधील लढतीत बाकावरच बसावे लागू शकते. 

आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे १० गोलंदाज

क्रमांकगोलंदाजसामनेगोलंदाजी इनिंग्सटाकलेले चेंडूविकेट्ससर्वोत्तम कामगिरीइकॉनॉमी रेट
1अर्शदीप सिंग64641,8361004/98.32
2युझवेंद्र चहल80792,409966/258.19
3हार्दिक पांड्या1141022,485944/168.20
4भुवनेश्वर कुमार87862,079905/46.96
5जसप्रीत बुमराह70691,579893/76.27
6रविचंद्रन अश्विन65651,672724/86.90
7अक्षर पटेल71681,571713/97.30
8कुलदीप यादव4039971695/176.77
9रवी बिश्नोई42421,182614/137.35
10रवींद्र जाडेजा74711,612543/157.13

Web Title: Asia Cup 2025 India vs Oman 12th Match Arshdeep Singh Became First Indian Bowler To Take 100 Wickets In T20Is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.