Sanju Samson Six Sri Lanka Coach Sanath Jayasuriya Shock Watch Video : भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोरमधील अखेरचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात बॅटिंग न मिळालेल्या संजू सॅमसनला या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. त्यानंही या संधीच सोन करून दाखवताना छोटीखानी पण एकदम धमाकेदार खेळी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संजूचा सिक्सर चाहतीचे ठुमके; जयसूर्या झाला शॉक
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात संजूनं २३ चेंडूत ३९ धावांची खेळी करत फायनलमध्ये बॅटिंगला मागे ठेवू नका, असा संदेशच कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीरला दिलाय. या खेळीत संजूच्या भात्यातून १ चौकारासह ३ षटकार पाहायला मिळाले. यात त्याने हसंरगाला मारलेल्या एक उत्तुंग षटकार पाहून श्रीलंकेचा कोच आणि माजी स्फोटक फलंदाज सनथ जयसूर्याही आश्चर्यचकित होऊन डोक्याला हात लावल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला एक चाहते ठुमके लगावत संजूच्या खेळीला दाद देताना दिसली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
संजू सॅमसनची आशिया चषक स्पर्धेतील कामगिरी
आशिया चषक स्पर्धेत संजू सॅमसनला प्रत्येक सामन्यात संधी मिळाली. ६ सामन्यात फक्त ३ वेळा त्याने बॅटिंग केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ओमान विरुद्धच्या लढतीत त्याने अर्धशतकी खेळी करताना ५६ धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो १३ धावा करून परतला होता. त्यानंतर आता श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तो अर्धशतकी खेळीचा डाव सहज साध्य करेल, असे वाटत असताना शनाकाच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो असलंकाकडे झेल देऊन माघारी फिरला.
सलामीवीराच्या रुपात छाप सोडली, आता तडजोड करण्याची वेळ
संजू सॅमसन याने २०१५ मध्ये टी-२० मध्ये पदार्पण केले. पण त्याला सातत्याने संधी मिळाली नाही.आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत ४८ सामन्यातील ४१ डावात त्याने ९६९ धावा केल्या आहेत. यात ३ शतकासह ३ अर्धशतकांचा समावेश आहे. शुबमन गिलच्या अनुपस्थितीत भारताच्या डावाची सुरुवात करताना त्याने तीन शतके झळकावली होती. पण आता पुन्हा त्याला फलंदाजी क्रमवारीत तडजोड करावी लागत आहे.
Web Summary : Sanju Samson's explosive 39 against Sri Lanka included massive sixes, stunning Sanath Jayasuriya. A fan's celebratory dance went viral. He showcased his batting prowess, demanding a spot in the finals lineup. He has scored 969 runs in 41 T20 innings.
Web Summary : श्रीलंका के खिलाफ संजू सैमसन के 39 रनों में शानदार छक्के शामिल थे, जिसने सनथ जयसूर्या को चौंका दिया। एक फैन का जश्न मनाने वाला डांस वायरल हो गया। उन्होंने अपनी बल्लेबाजी का प्रदर्शन किया, फाइनल में जगह मांगी। उन्होंने 41 टी20 पारियों में 969 रन बनाए हैं।