Join us

IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल

कोचची आक्रमक अंदाजातील ड्रेसिंग रूममधील रिअ‍ॅक्शन चर्चेचा विषय ठरतीये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 01:11 IST

Open in App

IND vs PAK Final. Gautam Gambhir Goes Crazy After Tilak Varma Hit Six  Haris Rauf Watch Video : दुबईच्या मैदानात भारतीय संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानला शह देत फायनल मारली. या विजयानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर स्वतःला आवरू शकला नाही. आशिया कप २०२५ च्या भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याच्या अखेरच्या क्षणी तिलक वर्मानं हारिस राउफच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार ठोकला. या षटकारानंतर गौतम गंभीरनं मॅच जिंकण्याआधीच सेलिब्रेशनला सुरुवात केली.  हा षटकार भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा होता.  तिलक वर्माच्या षटकारानंतर आता गौतम गंभीरचा ड्रेसिंग रूममधील तो  व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अखेरच्या षटकात भारतीय संघाला विजयासाठी ५ चेंडूत ८ धावांची आवश्यकता होती. इथून सामना कुठंही फिरू शकला असता. पण तिलक वर्मानं हारिस राउफच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारला अन् हा विजय टीम इंडियाचाच आहे यावर शिक्कामोर्तब केला. त्याने ८० मीटर लांब मारलेल्या षटकानानंतर गौतम गंभीरनं जोर जोरात टेबल आपटून एकच जल्लोष केला. त्याची आक्रमक अंदाजातील ड्रेसिंग  रूममधील रिअ‍ॅक्शन चर्चेचा विषय ठरत आहे.

IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

English
हिंदी सारांश
Web Title : Tilak Varma's Six Sparks Gambhir's Frenzy in India-Pakistan Final.

Web Summary : Tilak Varma's six against Pakistan in the Asia Cup final ignited wild celebrations. Coach Gautam Gambhir's enthusiastic reaction in the dressing room went viral after Varma sealed India's victory with a massive hit off Haris Rauf. Gambhir's aggressive celebration is now a hot topic.
टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपभारत विरुद्ध पाकिस्तानगौतम गंभीरतिलक वर्मा