IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर

पाकिस्तान संघाच्या सातत्याच्या पराभवानंतर इम्रान खान यांनी भारताविरुद्ध जिंकायची अजब आयडिया सांगत देशातील आपल्या विरोधकांची अब्रू चव्हाट्यावर आणल्याचे दिसते. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 00:41 IST2025-09-23T00:33:16+5:302025-09-23T00:41:45+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 Imran Khan Suggests Only Way Pakistan Can Beat India Is If PCB Chairman Mohsin Naqvi And Army Chief Asim Munir Bat As Openers | IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर

IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आशिया चषक स्पर्धेतील भारतीय संघाविरुद्ध पाकची दोन वेळा फजिती झाली. साखळी फेरीत एकतर्फी मात दिल्यावर सुपर फोरमध्येही टीम इंडियाने पाकची जिरवलीये. भारताविरुद्धच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर माजी वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान याने पाकची लायकी काढलीये. भारतीय संघाला पराभूत करायचं असेल तर आता सेना प्रमुख आसिम मुनीर यांच्यासोबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनाच ओपनिंग करावी लागेल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

भारताविरुद्ध जिंकायच असेल तर सेना प्रमुखांसोबत ओपनिंगला जा

आपल्या नेतृत्वाखाली पाक संघाला वर्ल्ड कप जिंकून दिल्यावर राजकारणात सक्रीय होत देशाचे नेतृत्व करणारा चेहरा सध्या  तुरुंगात आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांची बहीण अलीमा खान म्हणाल्या की, भारतीय संघाविरुद्ध मॅच जिंकायची असेल तर पाक सेना प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी ओपिनिंग करावी, असा सल्ला इम्रान खान यांनी दिला आहे. 

बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट

पंच हे आहेत  त्याचीही खात्री करा!

मॅचमध्ये अंपायरिंगची जबाबदारी मुख्य न्यायाधीश काझी फेज ईसा, मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुल्तान रझा यांच्याकडे सोपवा. थर्ड अंपायरच्या रुपात इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीस सरफराज डोगर असतील याचीही खात्री करा. तरच तुम्हाला भारताविरुद्ध जिंकता येईल, असा टोलाही  इम्रान खान यांनी लगावला आहे. पाकिस्तानी संघाला मिळणाऱ्या सततच्या पराभवांबद्दल इम्रान खान यांच्यासोबत चर्चा केली. त्यावर त्यांनी हा सल्ला दिलाय, असे इम्रान खान यांची  बहीण अमीमा खान यांनी म्हटले आहे.

भारताविरुद्ध जिंकण्याची अजब आयडिया देताना विरोधकांची अब्रू काढली

पाकिस्तानचे माजी क्रिकेटर आणि पंतप्रधान २०२३ पासून तुरुंगात आहेत. मोहसिन नक्वी यांनी पाक क्रिकेट उद्धवस्त केल्याचा आरोप अनेकदा इम्रान खान यांनी केला आहे. याशिवाय पाक सेना प्रमुख आणि अन्य न्यायाधीश मंडळींच्या कट कारस्थामुळे तुरुंगात असल्याचेही त्यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. पाकिस्तान संघाच्या सातत्याच्या पराभवानंतर इम्रान खान यांनी भारताविरुद्ध जिंकायची अजब आयडिया सांगत देशातील आपल्या विरोधकांची अब्रू चव्हाट्यावर आणल्याचे दिसते. 
 

Web Title: Asia Cup 2025 Imran Khan Suggests Only Way Pakistan Can Beat India Is If PCB Chairman Mohsin Naqvi And Army Chief Asim Munir Bat As Openers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.