युएईच्या मैदानात रंगणाऱ्या आशिया कप टी-२० स्पर्धेसाठी ऑगस्टच्या अखेरपर्यंत भारतीय संघाची निवड अपेक्षित आहे. या स्पर्धेसह कसोटी संघात कमबॅकसाठी श्रेयस अय्यर फिट आहे. दुसरीकडे सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याच्या फिटनेससंदर्भातील गोष्ट अजून गुलदस्त्यातच आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूर्या भाऊसह हार्दिक पांड्याला द्यावी लागणार फिटनेस टेस्ट
भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करणारा सूर्यकुमार यादव याच्यावर स्पोर्ट्स हार्नियाची सर्जरी झाली असून तो सध्या बंगळुरुस्थित राष्ट्रीय अकादमीत पुनर्वसानाची प्रक्रिया पूर्ण करत आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्यालाही फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. आयपीएल स्पर्धा झाल्यापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. ११ आणि १२ ऑगस्टला तो बंगळुरु स्थित राष्ट्रीय अकादमीत फिटनेस टेस्ट देणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
बाबरच्या पदरी भोपळा! रोहित पाठोपाठ शुबमन गिलची 'बादशाहत' सेफ?
हार्दिक पांड्यानं सरावाला सुरुवात केलीये, पण..
हार्दिक पांड्या हा भारतीय संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसह २०२५ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याने संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. हार्दिक पांड्याने आगामी आशिया कप स्पर्धेसाठी जुलैपासून मुंबईत सरावाला सुरुवात केली आहे. पण बऱ्याच दिवसांपासून क्रिकेट पासून दूर असल्यामुळे BCCI च्या नियमानुसार त्याला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. ही टेस्ट पार करुन तो आशिया कप संघात सामील होईल, अशी अपेक्षा आहे.
श्रेयस अय्यर फिटनेस टेस्ट झाला पास, तो आता कमबॅक करण्यास सज्ज
भारतीय संघातील मध्यफळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हा जवळपास दोन वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. २०२३ मध्ये त्याने अखेरचा आंतरारष्ट्रीय सामना खेळला होता. २७ ते २९ जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या फिटनेस टेस्टमध्ये तो पास झाला असून टी-२० संघासह कसोटी संघातही तो कमबॅक करण्यास सज्ज झालाय.
सूर्यकुमार यादवच्या फिटनेसच काय?
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार स्पोर्ट्स हार्नियाच्या शस्त्रक्रियेतून सावरून मैदानात उतरण्यासाठी प्रयत्नशील आहे. याचवर्षी जूनमध्ये जर्मनीतील म्युनिख येथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. फिटनेससाठी त्याला आणखी एक आठवडाभर बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत थांबावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने फलंदाजी करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. तो वेगाने रिकव्हर होत असून फिटनेस टेस्ट क्लियर केली तर तोच आशिया कप स्पर्धेत भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.