Afghanistan Squad for Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी अफगाणिस्तानच्या संघाने आपल्या प्राथमिक संघाची घोषणा केली आहे. IPL मध्ये शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली GT संघाकडून खेळताना दिसलेल्या राशीद खानकडे संघाने नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया कपसाठी २२ सदस्यीय प्राथमिक संघ (Preliminary Squad ) निवडला असून यात अनुभवी खेळाडूंसह नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू युएईतील शिबीरात सामील होणार असून यातून आशिया कपसाठी फायनल संघ निवडला जाईल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राशीद खानकडे कॅप्टन्सी
अफगाणिस्तान संघाने (Afghanistan Squad for Asia Cup 2025) पुन्हा एकदा टी२० संघाची धूरा लेग स्पिनर राशीद खान याच्याकडे सोपवली आहे. त्याच्याशिवाय संघात रहमानुल्लाह गुरबाझ, अजमतुल्लाह उमरझई, फजलहक फारूकी आणि मोहम्मद नबी यासारखे अनुभवी खेळाडूही आहेत.
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
या युवा चेहऱ्यांना मिळाली संधी
अफगाणिस्तानच्या संघाने आशिया कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात वफीउल्लाह ताराखिल, अब्दुल्ला अहमदझई आणि बशीर अहमद या तिघांचा समावेश आहे. जर त्यांना अंतिम संघात स्थान मिळाले, तर आशिया कप स्पर्धेतून ते आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करताना दिसतील.
आशिया कपसाठी अफगाणिस्तानचा संघ
राशीद खान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाझ (विकेटकीपर/बॅटर), सेदिकुल्लाह अतल, वफीउल्लाह ताराखिल, इब्राहिम झादरान, दरवेश रसूली, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, नंगयाल खारोटी, शराफुद्दीन अशरफ, करीम जनत, अजमतुल्लाह उमरझई, गुलबदीन नैब, मुजीब झदरान, एएम गजनफर, नूर अहमद, फजलहक फारूकी, नवीन-उल-हक, फरीद मलिक, सलीम साफी, अब्दुल्ला अहमदझई, बशीर अहमद.
Web Title: Asia Cup 2025 Afghanistan Squad Preliminary Rashid Khan Captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.