Join us

IND vs BAN : पदार्पणाच्या सामन्यात तिलकचा उडाला त्रिफळा; बांगलादेशच्या युवा खेळाडूनं वाढवली डोकेदुखी

ट्वेंटी-२० मध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माला वन डे क्रिकेटमधील आपल्या पदार्पणाच्या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 19:38 IST

Open in App

asia cup 2023 live updates in marathi : ट्वेंटी-२० मध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माला वन डे क्रिकेटमधील आपल्या पदार्पणाच्या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. बांगलादेशकडून पदार्पण करत असलेल्या तन्झीद हसन सकीबने तिलकचा त्रिफळा काढला. पदार्पणाच्या सामन्यात युवा भारतीय शिलेदाराला ९ चेंडूत केवळ ५ धावा करता आल्या. चेंडू यष्टीकडे सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिलकला चेंडूने चकमा दिला अन् त्रिफळा उडाला. 

युवा सकीबने भारतीय कर्णधार रोहित शर्माला (०) खाते देखील उघडू दिले नाही. पहिल्याच षटकात रोहितला बाद करून बांगलादेशच्या युवा खेळाडूने पदार्पणाचा सामना अविस्मरनीय केला. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, लोकेश राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.

आजच्या सामन्यासाठी बांगलादेशचा संघ - शाकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास (यष्टीरक्षक), तन्झीद हसन, अनामूल हक,  तौहीद हृदयॉय, शमीम हुसेन, मेहदी हसन मिराज, महेदी हसन, नसुम अहमद, तन्झीद हसन सकीब, मुस्तफिजुर रहमान.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशएशिया कप 2023तिलक वर्मारोहित शर्मा