Asia Cup 2022: शाहिन आफ्रिदीच्या दुखापतीमुळे संघाचे मोठे नुकसान; पाकिस्तानच्या कोचने स्पष्टच सांगितलं

शाहिन आफ्रिदी संघातून बाहेर जाणे म्हणजे मोठा झटका असल्याचे सकलैन मुश्ताक यांनी म्हटले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 10:50 AM2022-08-23T10:50:30+5:302022-08-23T10:52:21+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022 Shaheen Afridi's injury is a big loss for the team, says Pakistan head coach Saqlain Mushtaq | Asia Cup 2022: शाहिन आफ्रिदीच्या दुखापतीमुळे संघाचे मोठे नुकसान; पाकिस्तानच्या कोचने स्पष्टच सांगितलं

Asia Cup 2022: शाहिन आफ्रिदीच्या दुखापतीमुळे संघाचे मोठे नुकसान; पाकिस्तानच्या कोचने स्पष्टच सांगितलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली :  आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) ची स्पर्धा तोंडावरच असताना पाकिस्तानच्या (Pakistan) संघाला मोठा झटका बसला. संघातील प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) त्याच्या दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाला आहे. २७ ऑगस्टला आशिया चषक सुरू होणार अन् २० ऑगस्टला त्यांना मोठा धक्का बसला. टी-२० वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेत भारतीय संघाचे कंबरडे मोडणारा खेळाडूच आता दुखापतीमुळे ६ महिन्यांसाठी मैदानाबाहेर गेला आहे. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला हा मोठा धक्का आहे. दरम्यान, आफ्रिदीच्या जागेवर पाकिस्तानच्या संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनला (Mohammad Hasnain) संधी मिळाली आहे. 

हसन अलीला संघात स्थान मिळणार अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात होती मात्र हसनैनची संघात वर्णी लागली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB)आफ्रिदीला एक महिना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. मागील महिन्यात श्रीलंकेत झालेल्या गॉले कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. शाहिन शाह आफ्रिदीने आपल्या गुडघ्याची दुखापत लक्षात घेऊन आगामी आशिया चषक व इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. वैद्यकिय टीमने त्याला ४ ते ६ आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून पुनरागमन करण्याची शक्यता आहे. 

आफ्रिदीच्या दुखापतीमुळे संघाचे मोठे नुकसान 
पाकिस्तानी संघाचे प्रमुख प्रशिक्षक सकलैन मुश्ताक यांनी आफ्रिदीच्या दुखापतीला मोठा झटका म्हटले आहे. "साहजिकच बहुचर्चित स्पर्धेपूर्वी आणि इंग्लंड मालिकेपूर्वी शाहिन संघातून बाहेर जाणे आमच्यासाठी मोठा धक्का आहे. कारण तो असा खेळाडू आहे ज्याने स्वत:ला सर्व स्तरावर सिद्ध केले आहे आणि जगभरातील सर्वोत्तम फलंदाजांविरूद्ध चांगली कामगिरी केली आहे, असे सकलैन मुश्ताक यांनी पीटीआयशी संवाद साधताना म्हटले. 

मी लवकरच परत येईन - आफ्रिदी
शाहीन आफ्रिदीने आशिया चषक स्पर्धेत न खेळण्यावरून प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आशिया चषकासाठी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. वेगवान गोलंदाज आफ्रिदीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, "आमच्या प्लेइंग ११ मधील प्रत्येक खेळाडू सामना विजेता आहे. आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी माझ्या संघाला शुभेच्छा. चाहत्यांकडून मला लवकर बरे होण्यासाठी तुमच्या प्रार्थना हव्या आहेत. मी लवकरच परत येईन", एकूणच आफ्रिदीने पाकिस्तानी संघ मजबूत असल्याचे स्पष्ट केले आहे. आशिया चषकात २८ ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. 

आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.  


 

Web Title: Asia Cup 2022 Shaheen Afridi's injury is a big loss for the team, says Pakistan head coach Saqlain Mushtaq

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.