सिडनी क्रिकेट ग्राउंड (SCG) येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित अॅशेस मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या संघाने जेकब बेथेलच्या दमदार शतकाच्या जोरावर ८ विकेट्सच्या मोबदल्यात ३०२ धावा करत ११९ धावांची आघाडी घेतली आहे. खेळ थांबला त्यावेळी जेकब बेथेल १४२ धावांवर नाबाद होता. त्याआधी ऑस्ट्रेलियन संघाने ट्रॅविस हेड १६३ (१६६) आणि स्टीव्ह स्मिथ १३८ (२२०) यांच्या शतकासह तळाच्या फलंदाजीत वेबस्टरनं केलेल्या ८७ चेंडूतील ७१ धावांच्या खेळीसह पहिल्या डावात ५६७ धावांचा डोंगर उभारल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धावांचा डोंगर उभारताना ऑस्ट्रेलियाने प्रस्थापित केला नवा विक्रम
ही मोठी धावसंख्या उभारताना ऑस्ट्रेलियाने खास विक्रम आपल्या नावे केला. आतापर्यंतच्या १३४ वर्षात जे घडलं नाही ते कांगारुंच्या संघाने सिडनी कसोटीतील पहिल्या डावात करुन दाखवल. एवढेच नाही तर त्यांनी टीम इंडियाच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. इथं एक नजर टाकुयात त्या खास रेकॉर्डवर
खरंच किंग कोहलीनं पळ काढला? संजय मांजरेकरांचं कसोटीतील ‘विराट’ निवृत्तीवर मोठं वक्तव्य, म्हणाले…
याआधी इंग्लंडच्या नावे होता हा विक्रम
ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात ७ अर्धशतकी भागीदारीसह खास विक्रम आपल्या नावे केला. याआधी अॅशेस मालिकेच्या इतिहासात एका डावात ६ अर्धशतकी भागीदारीचा रेकॉर्ड होता. इंग्लंडच्या संघाने १८९२ मध्ये अॅडलेड येथे झालेल्या कसोटीत ही कामगिरी करून दाखवली होती. हा विक्रम ऑस्ट्रेलियाने मोडीत काढला आहे.
टीम इंडियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात ७ अर्धशतकी भागादारीचा अद्भूतपूर्व रेकॉर्ड पहिल्यांदा टीम इंडियाने साध्य केला होता. २००७ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारतीय संघाने ही कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाच्या या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरीचा डाव साधला आहे.
- सचिन-जाफर (पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी)
- सचिन- द्रविड (दुसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी)
- सचिन-गांगुली (चौथ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी)
- सचिन-लक्ष्मण (पाचव्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी)
- सचिन-धोनी (सहाव्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी)
- धोनी-झहीर (सातव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी)
- आरपी सिंह- श्रीसंत (दहाव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी)