Arjun Tendulkar, IPL 2022 Auction : अर्जुन तेंडुलकरचा भाव वाढला, मुंबई इंडियन्ससह आणखी एका संघाने दाखवला रस अन्...

Arjun Tendulkar, IPL 2022 Auction : अर्जुन तेंडुलकरने गेल्या वर्षीदेखील IPL च्या लिलावात नाव नोंदणी केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 08:26 PM2022-02-13T20:26:36+5:302022-02-13T20:26:54+5:30

whatsapp join usJoin us
Arjun Tendulkar, IPL 2022 Auction : Arjun Tendulkar sold to Mumbai Indians for 30 Lakh, Gujarat Titans also beat for him | Arjun Tendulkar, IPL 2022 Auction : अर्जुन तेंडुलकरचा भाव वाढला, मुंबई इंडियन्ससह आणखी एका संघाने दाखवला रस अन्...

Arjun Tendulkar, IPL 2022 Auction : अर्जुन तेंडुलकरचा भाव वाढला, मुंबई इंडियन्ससह आणखी एका संघाने दाखवला रस अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Arjun Tendulkar, IPL 2022 Auction :  अर्जुन तेंडुलकरने गेल्या वर्षीदेखील IPL च्या लिलावात नाव नोंदणी केली होती. त्यावेळीच मुंबईचा संघ त्याला विकत घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. लिलावात पहिल्यांदा जेव्हा त्याचं नाव घेण्यात आलं तेव्हा त्याला कोणीही वाली मिळाला नाही. त्यानंतर संपूर्ण लिलावप्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा UNSOLD खेळाडूंची नावं लिलावासाठी ठेवण्यात आली. त्यावेळी मुंबई इंडियन्सने २० लाखांच्या मूळ किमतीत अर्जुनला विकत घेतले. याही वेळेस अगदी अखेरच्या फेरीत अर्जुनचं नाव आलं आणि अपेक्षितपणे मुंबई इंडियन्सने बोली लावली, परंतु यावेळेत त्याच्यासाठी आणखी एका संघाने उत्सुकता दाखवली.

अर्जुनचं नाव येताच मुंबईने ऑक्शन पॅडल उंचावले, परंतु गुजरात टायटन्सनेही लगेच पॅडल उंचावल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मुंबई संघाचे मालक आकाश अंबानी गुजरातच्या टेबलकडे पाहून हसू लागले. अखेर मुंबईनेच ३० लाखांत त्याला आपल्या संघात घेतले. 

मुंबईने संघात विकत घेऊनही नशिबाने दिला दगा
मुंबईच्या संघासोबत अर्जुन तेंडुलकर सराव करत होता. IPLचा पहिला टप्पा भारतात खेळण्यात आला. त्यावेळी त्याला संधी मिळाली नाही. कोरोनाच्या तडाख्यानंतर दुबईत  दुसऱ्या टप्प्यासाठी तो संघासोबत गेला होता. पण त्यावेळीही त्याच्या नशिबाने त्याला दगा दिला. दुबईत संघासोबत सराव करताना त्याला दुखापत झाली आणि त्यामुळे एकही सामना न खेळताच त्याला मायदेशी परतावे लागले.

 

अर्जुननं मुंबईच्या सीनिअर संघात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 लीगमधून पदार्पण केलं होतं. त्यात त्यानं दोन सामन्यांत दोन विकेट्स घेतल्या. मुंबईच्या सीनियर संघाकडून पदार्पण करताच अर्जुन आयपीएल ऑक्शनसाठी पात्र ठरला होता. जुलै-ऑगस्ट २०१९नंतर २१ वर्षीय अर्जुन प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला उतरला. यापूर्वी त्यानं २०१८मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या चार दिवशीय दोन सामन्यांत १९ वर्षांखालील टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं होतं. अर्जुन यापूर्वी मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळला होता आणि २०१७-१८च्या कूच बिहार ट्रॉफीत त्यानं १९ विकेट्स घेतल्या. त्यात त्यानं दोन सामन्यांत ५-५ विकेट्स घेतल्या होत्या.

Web Title: Arjun Tendulkar, IPL 2022 Auction : Arjun Tendulkar sold to Mumbai Indians for 30 Lakh, Gujarat Titans also beat for him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.