Join us  

...तर 69 वर्षीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवृत्त व्हायला सांगाल का?; भारताच्या माजी क्रिकेटपटूचा सवाल

60 वर्षांसाठीच्या नियमावर भारताचे माजी क्रिकेटपटू नाराज...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 2:55 PM

Open in App

कोरोना व्हायरसच्या संकटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) स्थानिक क्रिकेट स्पर्धांसाठी एक नियमावली जाहीर केली. त्यानुसार 60 वर्षांवरील व्यक्तींना घरीच थांबण्यास सांगितले आहे. विशेषतः ज्यांना   कोणताही आजार आहे किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांनी सराव शिबिराला हजर राहू नये. बीसीसीआयच्या या निर्णयावर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि बंगाल संघाचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी 65 वर्षीय अरुण लाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उदाहरण देऊन, एक सवाल विचारला. 

मॅट फिशरच्या 'यॉर्कर'समोर फलंदाजानं घातलं लोटांगण; पाहा भन्नाट व्हिडीओ

MS Dhoniनं स्पष्टच सांगितले, 2019च्या वर्ल्ड कप संघासाठी तुझा विचार केला जाणार नाही; युवराज सिंगचा खुलासा 

''पंतप्रधान 69 वर्षांचे आहेत आणि ते देशाचा कारभार पाहत आहे. तुम्ही त्यांना निवृत्त होण्यास सांगाल का?,''असे अरुण लाल यांनी PTIला दिलेल्या मुलाखतीत विचारले. बंगाल क्रिकेट असोसिएशननं ( CAB) बीसीसीआयच्या नियमांचं पालन केल्यास अरुण लाल यांना सराव शिबीरादरम्यान उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे कोणतीही नियमावली मी कसं जगावं हे मला सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

''बंगाल संघाचा मी प्रशिक्षक राहीन की नाही, हे माझ्यासाठी तितके महत्त्वाचे नाही. पण, एक माणूस म्हणून मला माझ्या मनाप्रमाणे आयुष्य जगायचं आहे. मी 65 वर्षांचा आहे, म्हणून मी स्वतःला पुढील 30 वर्ष एका खोलीत कोंडून घेतलं पाहिजे, अशी अपेक्षा करू नका. असं होणार नाही,''असेही कॅन्सरवर मात करणारे अरुण लाल म्हणाले.

ते पुढे म्हणाले,''सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क घालणे आदी सर्व नियमांचे मी पालन करेन, पण स्वतःला कोंडून घेऊन जगणार नाही. कोरोना व्हायरस वय बघून होत नाही.''

भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर रायफलधारी रणरागिणी?; व्हिडीओ व्हायरल

देशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र!

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघनरेंद्र मोदीकोरोना वायरस बातम्या