Join us

टी-२०मध्ये भारत अव्वल, तर कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

भारताचा दबदबा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 07:49 IST

Open in App

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या वार्षिक क्रमवारीमध्ये भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, तर एकदिवसीयमध्ये न्यूझीलंडने अव्वल स्थान पटकावले. 

कसोटीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत. इंग्लंडच्या खात्यात ८८ गुण असून, १९९५नंतर पहिल्यांदाच्या इंग्लंडचे इतके कमी गुण झाले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड अव्वल आहे. दुसऱ्या स्थानी इंग्लंड असून, तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे. भारत आणि पाकिस्तान अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत.

भारताचा दबदबा टी-२० क्रिकेटमध्ये भारताने अव्वल स्थान राखले आहे. यानंतर इंग्लंड आणि पाकिस्तान अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. दक्षिण आफ्रिका चौथ्या तर ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानी आहे.

टॅग्स :टी-20 क्रिकेटभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियान्यूझीलंड
Open in App