...आणि अवतरला भारतीय क्रिकेटचा संस्मरणीय इतिहास

एक फलंदाज म्हणून आपल्या पदार्पणाच्या मालिकेत, सामन्यात इतक्या धावा करणे जबरदस्त कामगिरी होती आणि जागतिक क्रिकेटमध्ये आता हा एक सर्वात मोठ्या विश्वविक्रमापैकी एक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 03:14 AM2020-04-16T03:14:23+5:302020-04-16T03:15:39+5:30

whatsapp join usJoin us
... and an unforgettable history of Indian cricket | ...आणि अवतरला भारतीय क्रिकेटचा संस्मरणीय इतिहास

...आणि अवतरला भारतीय क्रिकेटचा संस्मरणीय इतिहास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अय्याझ मेमन

आॅस्टेÑलियामध्ये झालेली महिला टी२० विश्वचषक स्पर्धा पाहून मुंबईत परतल्यानंतर मी स्वत:ला वेगळे करून घेतले होते. यादरम्यान मी क्रिकेटवर आधारित अनेक पुस्तकांचे वाचन केलेच, शिवाय क्रिकेटवरील काही वेबसीरिज आणि चित्रपटांचाही आनंद घेतला. एक क्रिकेटप्रेमी म्हणून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या ‘सेल्फ क्वारंटाईन’दरम्यान केला. प्रत्येक आठवणीतून नव्या गोष्टीही समजता आल्या. १९७०-७१ सालचा भारताचा वेस्ट इंडिज दौरा कमालीचा ठरला होता. त्या दौऱ्यात सुनील गावसकरने स्वप्नवत पदार्पण करताना केवळ चार कसोटी सामन्यांत ७७४ धावा कुटल्या होत्या.

एक फलंदाज म्हणून आपल्या पदार्पणाच्या मालिकेत, सामन्यात इतक्या धावा करणे जबरदस्त कामगिरी होती आणि जागतिक क्रिकेटमध्ये आता हा एक सर्वात मोठ्या विश्वविक्रमापैकी एक आहे. ही मालिका भारताने जिंकली होती आणि क्रिकेट इतिहासामध्ये हा एक टर्निंग पॉर्इंट ठरला होता. यानंतर लगेच १९७१मध्ये ओव्हलमध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध मिळवलेला विजयही ऐतिहासिक ठरला होता. विंडीजप्रमाणेच हा विजयही भारताचा इंग्लंडमधील पहिला कसोटी विजय ठरला होता. इथूनच खºया अर्थाने भारतीय क्रिकेटच्या झंझावातास सुरुवात झाली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
पण अनेकांना कल्पना नसेल की, इंग्लंडविरुद्धच्या या विजयी सामन्यात बिशनसिंग बेदी यांची कामगिरी अनोखी ठरली होती. पहिल्या डावात त्यांनी भारताकडून सर्वाधिक ३६ षटके गोलंदाजी केली होती, मात्र दुसºया डावात त्यांना केवळ एक षटक गोलंदाजीस मिळाले आणि त्यातही त्यांनी बहुमूल्य बळी मिळवला होता. पण ओव्हलमधील त्या ऐतिहासिक विजयाचा खरा शिल्पकार होता तो चंद्रशेखर भागवत. लेगस्पिनर असलेल्या चंद्रशेखर यांच्या हाताला पोलिओ झाला होता. त्याने त्या सामन्यात ३८ धावांत ६ बळी घेत इंग्लंडचे कंबरडे मोडले होते. भारतीय क्रिकेटच्या इतिहासावर नजर टाकल्यास अनेक पैलूंवर पुस्तके लिहिली जातील. त्यामुळे मी वाचकांना आवाहन करेन की या सर्व गोष्टींचा आढावा घ्या.

तुम्ही देखील सज्ज व्हा, आपापले संघ निवडा...
क्वारंटाईनच्या काळामध्ये भारतीय क्रिकेटच्या इतिहासाचा आढावा घेत असताना १९३२ पासूनच्या काळातील सर्वोत्तम भारतीय संघ निवडण्याची कल्पना सुचली. यासाठी मी १९३०-१९६०, १९६१-१९९०, १९९१-२०२० अशा तीन काळातील सर्वोत्तम संघ निवडण्याचा प्रयत्न केला. मी माझे असे चार संघ निवडले आहेत, पण क्रिकेटप्रेमींनाही असे आवाहन करतो की त्यांनीही त्यांच्या मनातील सर्वोत्तम संघ निवडावेत आणि हो, यासाठी टीकाकारांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायलाही तयार राहा!

चार काळातील सर्वोत्तम संघ
१९३०-१९६० : विजय मर्चंट, मुश्ताक अली, पॉली उम्रीगर, विजय हजारे, विजय मांजरेकर, विनू मंकड, लाला अमरनाथ (कर्णधार), दत्तू फडकर, नरेण ताम्हाणे (यष्टिरक्षक), सुभाष गुप्ते, मोहम्मद निस्सार आणि गुलाम अहमद.
१९६१-१९९० : सुनील गावसकर, दिलीप सरदेसाई, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ, मोहिंदर अमरनाथ, मन्सूर अली खान पतौडी (कर्णधार), कपिलदेव, सय्यद किरमाणी, रमाकांत देसाई, इरापल्ली प्रसन्ना, चंद्रशेखर भागवत आणि बिशनसिंग बेदी.
१९९१-२०२० : वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, व्हीव्हीएस लक्ष्मण, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अनिल कुंबळे, हरभजन सिंग, झहीर खान, जवागल श्रीनाथ आणि मोहम्मद शमी.
चौथा संघ : रोहित शर्मा, फारुख इंजिनीयर, रुसी मोदी, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली (कर्णधार), चंदू बोर्डे, सलीम दुराणी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अमर सिंग, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह.

(लेखक लोकमत वृत्तसमुहात सल्लागार संपादक आहेत)

Web Title: ... and an unforgettable history of Indian cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.