Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सगळे एकच ओळ..." सूर्या दादानं न्यूझीलंडचा कर्णधार सँटनरला दिला कडक रिप्लाय; तो नेमकं काय म्हणाला?

सूर्या दादा असं का म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 20:10 IST

Open in App

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलआधी ओपन चॅलेंज देत भारतीय चाहत्यांना दुखावणाऱ्या न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरला टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं कडक रिप्लाय दिला आहे. काही भारतीय चाहत्यांची मन दुखावली तरी चालतील, पण आम्ही यावेळी पहिली वहिली ट्रॉफी उंचावणारच, या धाटणीतील वक्तव्य मिचेल सँटनर याने केले होते. यावर सूर्यकुमार यादवनं आपल्या हटके स्टाईलमध्ये उत्तर दिले.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

"सगळे एकच ओळ...."

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या फायनल सामन्याआधी मिचेल सँटनर याच्यानंतर सूर्यकुमार यादवनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मिचेल सँटनरच्या वक्तव्यावर सूर्यकुमार यादव हसत हसत म्हणाला की, "सगळे एकच ओळ पाठ करून आले आहेत. त्यांना जरा वेगळं काहीतरी बोलायला सांगा."   

T20 WC 2026 Final ... तर ते 'चोकर्स' ठरतील! भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनलसंदर्भात डेल स्टेनची भविष्यवाणी

सूर्या दादा असं का म्हणाला?

टीम इंडिया जेतेपदाची प्रबळ दावेदार असली तरी यावेळी आम्हीच जिंकू, असे ओपन चॅलेंज देताना मिचेल सँटनर याने भारतीय चाहत्यांचा उल्लेख केला होता. काहींची मन दुखावली तरी आम्हाला फरक पडत नाही. कारण आम्ही ट्रॉफी जिंकण्यासाठी आलो आहोत. त्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करु, अशा आशयाचे भाष्य सँटनरने केले होते. त्याचे हे शब्द २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनल आधी ऑस्ट्रेलिया पॅट कमिन्सच्या वक्तव्याची आठवण करून देणारे होते. एवढेच नाही तर यंदाच्या हंगामातील वानखेडेच्या मैदानातील सेमीफायनच्या लढती आधी इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याने वानखेडेवर शांतता दिसेल आणि ही गोष्ट आमच्यासाठी चांगली असेल, या भाषेत टीम इंडियासह भारतीय चाहत्यांना डिवचले होते. टीम इंडियाविरुद्धच्या सामन्याआधी प्रतिस्पर्धी संघातील प्रत्येक कर्णधार एकाच धाटणीत बोलतो. त्यांना नवीन काहीतरी बोलायला सांगा, असा टोला सूर्यानं मारला.

वरुण चक्रवर्तीची पाठराखण!

भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला वरुण चक्रवर्तीचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंताजनक आहे का? असा प्रश्नही विचारण्यात आला होता. यावर सूर्यकुमार म्हणाला की, आम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता सतावत नाही. जिंकल्यावर आम्ही फार विचार करत नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे.  प्रत्येकासाठी प्रत्येक दिवस चांगला असेलच असे नाही. प्रत्येकजण योगदान देतो. शेवटी विजय मिळवणे हाच उद्देश असतो. सूर्याचं हे वक्तव्य टीम इंडिया फायनलसाठी संघात कोणताही बदल करण्याच्या मूडमध्ये नाही, असे संकेत देणारे आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Suryakumar Yadav's sharp reply to Santner's T20 World Cup challenge.

Web Summary : Suryakumar Yadav responded to New Zealand captain Santner's pre-final challenge, stating everyone uses the same lines. He defended Varun Chakravarthy's form, emphasizing teamwork and focusing on winning the T20 World Cup final.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध न्यूझीलंडसूर्यकुमार यादवभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ