टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी आता फक्त वनडेच्या माध्यमातूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचे दिसेल. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ही जोडी पुन्हा टीम इंडियाकडून मैदानात उतरण्यास सज्ज आहे. पण ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकूनही रोहित शर्माची कॅप्टन्सी गेली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोघांना खेळायचंय, पण BCCI नं तयार केलाय त्यांच्या निवृत्तीचा प्लॅन?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संघ निवडीनंतर BCCI निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली आगामी वनडे वर्ल्ड कपच्या योजनेचा भाग आहेत का? असा प्रश्नही विचारण्यात आला होता. यावर त्यांनी जे उत्तर दिले ते BCCI नं या जोडीला उर्वरित एका फॉरमॅटमधूनही संघाबाहेर काढण्यासाठी पहिली चाल खेळल्यासारखं आहे. नेमकं आगरकर काय म्हणाले? दोघांची खेळण्याची इच्छा असताना BCCI नं त्यांच्या रिटायरमेंटचा प्लॅन आखलाय का? जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर गोष्ट
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
रोहित-विराट २०२७ वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार का? अजित आगरकरांनी असं दिलं उत्तर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या संघ निवडीनंतर अजित आगरकर म्हणाले की, "वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला अजून खूप उशीर आहे. सध्याच्या घडीला आमचा सर्व फोकस हा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनी २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासंदर्भात (Non-Committal) आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही."
आगरकर अँण्ड BCCI ची दुटप्पी भूमिका
अजित आगरकर यांचे संभ्रमात टाकणारे वक्तव्य रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे वनडे भविष्य धोक्यात असल्याचे संकेत देणारे आहे. एका बाजूला त्यांनी या दोघांना दोन वर्षे पुढे असलेल्या स्पर्धेबद्दल सध्या बोलायचं नाही असं म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला वनडेतील कॅप्टन्सी बदलाच्या प्रयोगाबद्दल त्यांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कॅप्टन बरा, अशी भूमिका मांडली. एवढेच नाही तर वनडे क्रिकेट खूप कमी खेळले जात आहे, असा दाखलाही त्यांनी दिला. वेगवेगळ्या फरमॅटमध्ये वेगवेगळे कॅप्टन नको, असे म्हणत रोहितचा पत्ता कट केला. पण टी-२० संघातील सूर्याचा प्रयोग कायम ठेवलाय. ही गोष्ट आगरकरांच्या बोलण्यातील दुटप्पी भूमिका समोर आणणारी आहे.
...तर रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधी निवृत्ती घेणार?
आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ मोजके वनडे सामने खेळणार आहे. रोहितची कॅप्टन्सी गेल्याने, फॉर्म दाखवला नाही तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवणं बीसीसीआयसाठी सहज शक्य होईल. दुसरीकडे BCCI विराटसाठी टीममध्ये जागा कायम ठेवायची तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा डाव खेळेल. तो त्यासाठी तयार होईल, याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे BCCI नं दोन्ही दिग्गजांना वनडेतून आउट करण्यासाठी पहिली चाल खेळलीये, असेच म्हणावे लागेल. जर रोहित-विराट BCCI नं केलेल्या या प्लॅनमध्ये फसले तर त्यांना वनडे वर्ल्ड कप आधीच निवृत्ती घेण्याची वेळ येऊ शकते.