भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) पुरुष वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मोक्याच्या क्षणी मोठी चाल खेळली आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ऐतिहासिक विजयाचा माहोल असताना त्यांनी आपला कार्यकाळ वाढवण्याचा डाव खेळल्याची माहिती समोर येत आहे. वनडे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेपर्यंत पदावर कायम ठेवण्यात यावे, अशी विनंती त्यांनी बीसीसीआयकडे केल्याचे समजते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बीसीसीआय या चेहऱ्यावर विश्वास दाखवणार का?
जुलै २०२३ मध्ये अजित आगरकर यांची मुख्य निवडकर्त्यांच्या रुपात नियुक्ती झाली होती. चेतन शर्मा यांची जागा घेणाऱ्या आगरकरांची कारकिर्द जून २०२६ पर्यंत आहे. बीसीसीआय यासंदर्भात विचार करत असून व्हॉइट बॉल क्रिकेटमधील टीम इंडियाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात येणार का? ते पाहण्याजोगे असेल.
"एकही प्याला नको रे बाबा!" चहलनं दारु सोडली; एबी डिव्हिलियर्सशी गप्पा मारताना तो नेमकं काय म्हणाला?
चर्चित निवडकर्त्यांपैकी एक
२०२०-२१ मध्ये मुख्य निवडकर्त्याचे पद रिक्त असताना अजित आगरकरांची संधी हुकली होती. पण चेतन शर्मा यांच्यानंतर २०२३ मध्ये ते बीसीसीआय निवड समितीच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. दिलीप वेंगसरकर, कृष्णचारी श्रीकांत यांच्यानंतर प्रभावि आणि चर्चित निवडकर्त्यांच्या यादीत अजित आगरकर यांचा समावेश होतो.
अजित आगरकर यांच्या कारकिर्दीत व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये दबदबा
आगरकर यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ फायनलपर्यंत पोहचला होता. २०२४ आणि २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने सलग दोन वेळा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. २०२३ आणि २०२५ मध्ये आशिया कप तसेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (२०२५) स्पर्धेतही टीम इंडियाचा दबदबा राहिला. मुख्य निवडकर्त्याच्या रुपात अजित आगरकर यांनी हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादववर दाखवलेला भरवसा आणि रोहितच्या जागी शुभमन गिलकडे वनडे कॅप्टन्सी देण्याचा धाडसी निर्णय चांगलाच चर्चेत राहिला.
कसोटीत मात्र उलट घडलं, याचा विचार केला तर...
अजित आगरकर यांच्या कारकिर्दीत मर्यादीत षटकांच्या स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा राहिला. पण कसोटी मात्र याउलट घडलं. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानातील लाजिरवाण्या पराभवासह बॉर्डर गावसकर स्पर्धेत टीम इंडियाला एकहाती पराभवाचा सामना करावा लागला. या कामगिरीचा विचार केला तर आगकरांच्या बाबतीत शंका निर्माण होऊ शकते. पण वनडेचा विचार त्यांचा डाव यशस्वी ठरू शकतो.