IND vs WI Test Ajit Agarkar On Ravindra Jadeja Being Named As Vice Captain : वेस्ट इंडिज विरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची नुकतीच घोषणा करण्यात आलीये. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली निवडलेल्या १५ सदस्यीय संघातून इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग असलेल्या काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. घरच्या मैदानात रंगणाऱ्या कसोटी मालिकेतील सर्वात मोठा बदल म्हणजे उप कर्णधार पदाची जबाबदारी ही अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आलीये.
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले.
जडड्डूला टीम इंडियात 'पार्ट टाइम डेप्युटी'ची ड्युटी
एका बाजूला भविष्यातील संघ बांधणीवर भर दिला जात असताना दुसऱ्या बाजूला ३६ वर्षीय जड्डूकडे मोठी जबाबदारी का? असा प्रश्न पडू शकतो. इंग्लंड दौऱ्यावर शुबमन गिलकडे कसोटी संघाचे नेतृत्व सोपवल्यावर BCCI नं रिषभ पंतला उप कर्णधार केले होते. ही गोष्ट कसोटीत टीम इंडियाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे मानली जात होती. पण आता घरच्या मैदानातील कसोटी मालिकेसाठी BCCI नं युवा कर्णधाराच्या साथीला 'ओल्ड गोल्ड फॉर्म्युला' आजमावल्याचे दिसते. पंत इंग्लंड दौऱ्यावरील दुखापतीतून अजूनही सावरलेला नाही. त्यामुळेच ३६ वर्षीय जडेजाला टीम इंडियात पार्ट टाइम डेप्युटीची ड्युटी लागलीये. पंत आला की, तो पुन्हा फुल टाइम ही भूमिका बजावताना दिसेल. BCCI निवड समीतीचे प्रमुख अजित आगरकर यांनी ड तसे संकेत दिले आहेत.
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
काय म्हणाले आगरकर?
रवींद्र जडेजाकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यासंदर्भात आगरकर म्हणाले आहेत की, रिषभ पंत संघात नसल्यामुळे आगामी दौऱ्यात नवा उप कर्णधार जड्डू असेल, हे चित्र स्पष्ट होते. तो टीम इंडियातील अनुभवीखेळाडू आहे. पंतच्या दुखापतीसंदर्भात सविस्तर माहिती नाही. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपर्यंत तो संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे, असे म्हणत तो नसल्यामुळेच जड्डूकडे जबाबदारी दिल्याचे आगरकरांनी स्पष्ट केले आहे.
कधी अन् कुठं रंगणार भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिका?
- पहिला कसोटी सामना : २ ते ६ ऑक्टोबर- अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)
- दुसरा कसोटी सामना : १० ते १४ ऑक्टोबर- दिल्ली (अरुण जेटली स्टेडियम)