Join us

ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचं अकाऊंट हॅक  

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉटसनचा सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले आहे. मागील आठवड्यात त्याचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 14:33 IST

Open in App

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉटसनचासोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले आहे. मागील आठवड्यात त्याचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते आणि आता त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट्सवरही हॅकर्सने हल्ला केला आहे. त्याच्या ट्विटर अकाऊंटवर काही चित्रविचित्र पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. आता तशीच परिस्थिती त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर उद्भवली आहे.

वॉटसनने सोमवारी भारताच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंसोबत एक फोटो इंस्टावर पोस्ट केला होता. पण, मंगळवारी त्याचे अकाऊंट हॅक झाले. त्यावर अनेक आक्षेपार्ह फोटो पोस्ट होऊ लागले आहेत. वॉटसनच्या सोशल मीडिया टीमनं हे फोटो डिलिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. इंस्टावर वॉटसनचे 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. यापूर्वी पाकिस्तानच्या फाखर झमानचेही ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. 

टॅग्स :शेन वॉटसनसोशल मीडियाइन्स्टाग्रामट्विटर