Ruturaj Gaikwad Shatters Michael Bevan's World Record: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करताना ऋतुराज गायकवाड याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून टीम इंडियातून डावलण्यात आलेल्या ऋतुराज गायकवाडने जयपूर येथील डॉ. सोनी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या गोवा विरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्र संघाची अवस्था ३ बाद २ अशी बिकट असताना मैदानात उतरलेल्या ऋतुराज गायकवाडनं १३१ चेंडूत नाबाद १३४ धावांची खेळी केली. या नाबाद शतकी खेळीसह त्याने २० वर्षांपासून अबाधित असलेला ऑस्ट्रेलियन दिग्गज मायकेल बेव्हनचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लिस्ट एक क्रिकेटमध्ये नंबर वन कामगिरी
गोवा विरुद्धच्या नाबाद १३४ धावांच्या कामगिरीनंतर लिस्ट ए क्रिकेटमध्ये ऋतुराज गायकवाडची सरासरी ५८.७२ झाली आहे. ही जगभरातील सर्व वन-डे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वोच्च सरासरी आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये ९५ डावात ५०५० धावा करताना पुणेकर बॅटरनं २० शतके आणि १९ अर्धशतके झळकावली आहेत. वनडेत तो सातत्यपूर्ण कामगिरी करत असताना देखील न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून त्याचा पत्ता कट करण्यात आला. देशांतर्गत स्पर्धेत दमदार कामगिरीसह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेतही त्याने शतक झळकावले होते.
Vijay Hazare Trophy : हार्दिक पांड्याची वादळी खेळी! ‘बडे मियाँ’च्या कॅप्टन्सीत ‘छोटे मियाँ’चा धमाका!
लिस्ट A क्रिकेटतील सर्वोच्च सरासरी
- ऋतुराज गायकवाड- ५८.७२*
- मायकेल बेव्हन- ५७.८६
- सॅम हेन- ५७.७६
- विराट कोहली- ५७.६७
गोवा विरुद्धच्या सामन्यात पार केला लिस्ट ए क्रिकेटमधील ५००० धावांचा टप्पा
ऋतुराज गायकवाडने गोवाविरुद्धच्या आपल्या धडाकेबाज १३४ धावांच्या कामगिरीसह लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५ हजार धावांचा टप्पाही पार केला. त्याच्या या खेळीमुळे महराष्ट्र संघाने निर्धारित ५० षटकात २४९ धावांपर्यंत मजल मारली. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत १५ व्या शतकासह त्याने या स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या अंकीत बावनेच्या विक्रमाशी बरोबरीचा डावही साधला आहे.