Join us
Daily Top 2Weekly Top 5

ICC T 20 Rankings : ईशान किशनने पाकिस्तानी साहिबजादाला टाकले मागे; अभिषेक शर्मासह संजूचाही जलवा

ज्या पाकिस्तानी खेळाडूमुळे अभिषेक शर्माचं अव्वलस्थान धोक्यात आले होते त्या साहिबजादा फरहानला मागे खेचत ईशान किशनने दुसऱ्या स्थानावर झेप मारली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 14:01 IST

Open in App

ICC T 20 Rankings : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या नव्या आयीसीसी क्रमवारीत भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माला मोठा दिलासा मिळाला आहे. स्पर्धेत धावांसाठी संघर्ष करताना दिसलेल्या अभिषेक शर्मानं न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये विक्रमी अर्धशतक झळकावले होते. या खेळीच्या जोरावर त्याने ICC टी-२० तील फलंदाजांच्या क्रमवारीतील आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. ज्या पाकिस्तानी खेळाडूमुळे अभिषेक शर्माचं अव्वलस्थान धोक्यात आले होते त्या साहिबजादा फरहानला मागे खेचत ईशान किशनने दुसऱ्या स्थानावर झेप मारली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पाकिस्तानी बॅटर मागे पडला! आाता अभिषेक अन् ईशानमध्येच 'नंबर वन'ची स्पर्धा

अभिषेक शर्माला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पण मोक्याच्या क्षणी त्याने आपल्यातील धमक दाखवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये त्याने १८ चेंडूत अर्धशतक साजरे करत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील नॉकआउटमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले होते. या खेळीच्या जोरावर ८७५ रेटिंगसह तो अव्वलस्थानी कायम आहे.  ईशान किशन याने दोन स्थानांनी झेप घेत यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला खाली खेचत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात आता ८७१ रेटिंग पॉइंट्स जमा असून आगामी काळात त्याची नंबर वनसाठी अभिषेकसोबतच स्पर्धा पाहायला मिळाले.  साहिबजादा ८४८ रेटिंगसह या यादीत तिसऱ्या स्थानावर असून इंग्लंडचा  फिल सॉल्ट (७९२ रेटिंग) आणि श्रीलंकेचा पथुम निसंका (७६६ रेटिंग) अनुक्रमे पाचव्या आणी सहाव्या क्रमांकावर आहेत.

IPL 2026 : जसप्रीत बुमराहसाठी BCCI चा मेगा प्लॅन! मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढणार?

संजू फायद्यात! सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

संजू सॅमसन याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उशीराने संधी मिळाल्यावर सलग तीन अर्धशकाच्या जोरावर ३०० पेक्षा अधिक धावा करत मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. या दमदार कामगिरीचा त्याला मोठा फायदा झाला असून १८ स्थांनाच्या सुधारणेसह तो थेट २२ व्या स्थानी पोहचला आहे. अभिषेक आणि ईशान किशनशिवाय तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव हे अव्वल १० मध्ये आहेत. पण तिलक वर्मा एका स्थानाच्या घसरणीसह सातव्या तर सूर्या २ स्थांनी घसरून नवव्या स्थानावर पोहचला आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : ICC T20 Rankings: Ishan Kishan Surpasses Pakistani Sahibzada; Abhishek, Sanju Shine

Web Summary : Ishan Kishan jumped to second in ICC T20 rankings, surpassing Pakistani Sahibzada Farhan. Abhishek Sharma retains top spot after a strong performance against New Zealand. Sanju also made gains.
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआयसीसीअभिषेक शर्माइशान किशनसंजू सॅमसनट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६