ICC T20I Rankings : आशिया चषक २०२५ स्पर्धेतील धमाकेदार कामगिरीनंतर आता अभिषेक शर्मानंआयसीसी टी-२० क्रमवारीत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. अभिषेक शर्मा हा छोट्या फॉरमॅटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करताना दिसतोय. गेल्या काही महिन्यांपासून तो क्रमवारीत नंबर वन आहे. आता टी-२० क्रमवारीच्या इतिहासात त्याने सर्वोच्च रेटिंगचा नवा विश्व विक्रम प्रस्थापित केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् अभिषेक शर्मानं सेट केला ICC टी-२० क्रमवारीत सर्वोच्च रेटिंगचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड
यंदाच्या टी-२० आशिया चषक स्पर्धेत अभिषेक शर्मानं ३०० पेक्षा अधिक धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने टी-२० क्रमवारीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च रेटिंगचा डाव साधलाय. याआधी इंग्लंडचा डेविड मलान ९१९ या सर्वोच्च रेटिंगसह टॉपला होता. अभिषेक शर्मानं ९२६ रेटिंगवर पोहचत इंग्लंडच्या माजी बॅटरला मागे टाकत नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलाय.
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
Asia Cup Final आधी अभिषेकनं ९३१ रेटिंगपर्यंत झेप मारली, पण...
आशिया चषक २०२५ स्पर्धेत अभिषेक शर्माच्या भात्यातून सलग तीन अर्धशतके पाहायला मिळाली. तिन्ही वेळा त्याला शतकी डाव साधण्याची संधी होती. पण एकदाही त्याला यात यश मिळाले नाही. पण रेटिंगमध्ये तो ९३१ पर्यंत पोहचला. पाकिस्तान विरुद्धच्या फायनल लढतीत तो स्वस्तात माघारी फिरला. त्यामुळे ९३१ वरून त्याच्या रेटिंग पॉइंट्स ९२६ इतके झाले. घसरण झाल्यावरही त्याने या रेटिंग पॉइंट्सच्या जोरावर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वकालीन सर्वोच्च रेटिंगचा आधीचा विक्रम मोडीत काढण्यात यश मिळवले. मलान याने २०१० मध्ये आयसीसी क्रमवारीत टॉपला पोहचताना ९१९ रेटिंग पॉइंट्स कमावले होते. जवळपास १५ वर्षे त्याचा हा रेकॉर्ड अबाधित राहिला. पण आता अभिषेकनं हा रेकॉर्ड मोडीत काढला..
Web Summary : Abhishek Sharma's stellar Asia Cup performance propelled him to the top of the ICC T20I rankings. He surpassed England's Dawid Malan with a record-breaking 926 rating, marking a historic first in T20I history.
Web Summary : अभिषेक शर्मा के शानदार एशिया कप प्रदर्शन ने उन्हें आईसीसी टी20आई रैंकिंग में शीर्ष पर पहुंचाया। उन्होंने इंग्लैंड के डेविड मलान को 926 रेटिंग के साथ पीछे छोड़ दिया, जो टी20आई इतिहास में पहली बार हुआ है।