Join us

जुन्या मित्रासोबत नवा फोटो, "या" मैत्रीबद्दल सचिन एका वाक्यात सांगतो

टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध लाजीरवाणा पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर सोशल मीडियातून भारतीय संघ आणि कर्णधार रोहित शर्मावर मोठी टिका झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 19:56 IST

Open in App

मास्टरब्लास्टर आणि टीम इंडियाचा माजी फलंदाज भारतरत्न सचिन तेंडुलकर सध्या सुट्ट्या एन्जॉय करतोय. काही दिवसांपूर्वी सचिनने कोल्हापूरात धडक मारली होती. त्यावेळी, नृसिंहवाडीत जाऊन दत्त मंदिरात पहाटेची पूजाही केली. सचिनचे ते फोटो व्हायरल झाले. त्यानंतर, बेळगाव-गोवा मार्गावर एका चहाच्या कँटीनवर सचिनने चहा आणि टोस खाल्ल्याचा व्हिडिओ समोर आला. यातील सचिनचा साधेपणा आणि नम्रता लोकांना चांगलीच भावली. सध्या सोशल मीडियावर सचिन चांगलाच एक्टीव्ह झाला आहे. आता, त्याने आपल्या जुन्या मित्रासोबतचा फोटो शेअर केला आहे. 

टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध लाजीरवाणा पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर सोशल मीडियातून भारतीय संघ आणि कर्णधार रोहित शर्मावर मोठी टिका झाली. यावेळी, सचिन तेंडुलकर टीम इंडियाच्या मदतीला धावून सचिनने एका नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगत फिलॉसॉफी मांडली. तसेच, भारतीय चाहत्यांना पराभव मान्य करण्याचंही सांगितलं होतं. सचिन सध्या फॅमिलीला वेळ देत असून कुटुंबीयांसमेवत दौरेही करत आहे. काही दिवसांपूर्वी सचिनने एबी डेव्हीलियर्ससोबतचा फोटो शेअर केला होता. आता, सचिनने आणखी एका मित्रासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, तो क्रिकेटमधील आपल्या जुन्या मित्रासोबत दिसून येत आहे. ब्रायन लारासोबतचा हा फोटो आहे. सचिन आणि लारा हे दोघेही चांगले मित्र असून आयपीएलमध्येही ते एकत्र खेळले आहेत. 

सचिनने ब्रायन लारासोबतचा नवा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, दोघेही सुटबूटमध्ये दिसून येतात. मैदानावर टीशर्ट  आणि क्रिकेट जर्सीवर दिसणारे हे जुने मित्र नव्याने भेटले तेव्हा सुटात दिसले. या दोघांचा फोटो पाहून चाहत्यांनाही आनंद झाला. सचिनने ट्विटरवरुन हा फोटो शेअर करताना, Some friendships are timeless! असं मैत्रीचं कॅप्शन दिलं आहे. काही मैत्री कालातील असतात, असे सचिनने म्हटले आहे. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरट्विटरसोशल मीडियाभारतीय क्रिकेट संघ
Open in App