Join us

स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच

इंग्लंडच्या मैदानात स्मृती मानधनाची कमाल, शतकी खेळीसह साधला मोठा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:51 IST

Open in App

ENG W vs IND W, 1st T20I Maiden T20I Century For Smriti Mandhana : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात कार्यवाहू कर्णधाराच्या रुपात मैदानात उतरून स्मृती मानधना विक्रमी शतक झळकावले आहे.  भारतीय महिला संघाने नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानातून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या मोहिमेला सुरुवात केली. इंग्लंडच्या मैदानातील पहिल्याच सामन्यात  स्मृती मानधना हिने आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील आपले पहिले शतक झळकावले. या शतकी खेळीसह तिने  खास विक्रमाला गवसणी घातली आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात  शतक झळकवणारी ती पहिली  भारतीय महिला क्रिकेटर ठरलीये.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नॉटिंघमच्या ट्रेंड ब्रिज स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या स्मृती मानधनाने शफाली वर्माच्या साथीनं भारताच्या डावाची सुरुवात केली.  पहिल्या विकेटसाठी दोघांनी ७७ धावांची भागादीरी रचत इंग्लंडचा निर्णय फोल ठरवला. त्यानंतर स्मृती मानधनाने ५१ चेंडूत शतक साजरे केले. महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील ही पाचव्या क्रमांकाची जलद शतकी खेळी ठरली.   

स्मृती मानधनानं मोडला हरमनप्रीत कौरचा विक्रम 

स्मृती मानधना हिने आपल्या टी-२० कारकिर्दीतील पहिल्या शतकी खेळीसह क्रिकेटच्या छोट्या प्रकारात मोठी खेळी करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. याआधी टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाकडून सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा  नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावे होता. २०१८ मध्ये तिने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तिने १०३ धावांची खेळी केली होती. इंग्लंड विरुद्धच्या  सामन्यात स्मृती मानधनाने ११२ धावांच्या खेळीसह तिचा विक्रम मोडीत काढला.

 महिला टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वोच्च धावसंख्या उभारणाऱ्या बॅटर्स

  • स्मृती मानधना- ११२ धावा, विरुद्ध इंग्लंड, ट्रेंट बिज (२८ जून, २०२५)
  • हरमनप्रीत कौर- १०३ धावा, विरुद्ध न्यूझीलंड, प्रोव्हिडन्स (९ नोव्हेंबर, २०१८  )
  • मिताली राज- ९७ धावा विरुद्ध मलेशिया क्वालालंपूर (३ जून, २०१८)
  • स्मृती मानधना-८७ धावा विरुद्ध आयर्लंड, गकेबेरहा (२० फेब्रुवारी, २०२३)
  • स्मृती मानधना- ८६ धावा विरुद्ध न्यूझीलंड, हेमिल्टन  (१० फेब्रुवारी, २०१९)
टॅग्स :स्मृती मानधनाभारत विरुद्ध इंग्लंडटी-20 क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ