२ धावांत ५ विकेट्स! शेफाली वर्माने गोलंदाजीत कमाल केली, भारताने मालिका जिंकली 

IND vs BAN 2nd T20I : भारतीय महिला संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात बांगलादेशवर ८ धावांनी विजय मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 04:49 PM2023-07-11T16:49:50+5:302023-07-11T16:50:20+5:30

whatsapp join usJoin us
5 wickets in 2 runs! IND vs BAN :  W+1, W, 0, W, 0, W by Shafali Verma in the final over while defending just 10 runs, India defended 95 runs in the 2nd T20I & won the series | २ धावांत ५ विकेट्स! शेफाली वर्माने गोलंदाजीत कमाल केली, भारताने मालिका जिंकली 

२ धावांत ५ विकेट्स! शेफाली वर्माने गोलंदाजीत कमाल केली, भारताने मालिका जिंकली 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs BAN 2nd T20I : भारतीय महिला संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात बांगलादेशवर ८ धावांनी विजय मिळवला अन् तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारतीय महिला संघाच्या ८ बाद ९५ धावांचा पाठगाल करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ ८७ धावांत तंबूत परतला. शेफाली वर्मा ( ३-१५), दीप्ती शर्मा ( ३-१२) आणि मिन्नू मणी ( २-९) यांची उत्तम गोलंदाजी केली. शेफाली वर्माने २०व्या षटकांत १० धावांचा बचाव करताना ४ विकेट्स मिळवल्या. 


स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी सुरुवात तर चांगली केली, परंतु त्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी पटापट विकेट्स घेतल्या. स्मृती मानधना ( १३) व शेफाली ( १९) या दोघी फलकावर ३३ धावा असताना माघारी परतल्या. शेफालीची विकेट घेणाऱ्या सुल्ताना खातूनने पहिल्याच चेंडूवर हरमनप्रीतचा त्रिफळा उडवला. यास्तिका भाटीया ( ११), दीप्ती शर्मा ( १०) व अमनज्योत कौर ( १४) वगळल्यास भारताच्या अन्य फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताला ८ बाद ९५ धावांवर समाधान मानावे लागले. खातूनने ३, फहिमा खातूनने २ विकेट्स घेतल्या.  


मणी व शर्मा यांनी ९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशच्या सलामीच्या दोन्ही खेळाडूंना माघारी पाठवले. बांगलादेशचा निम्मा संघ ६४ धावांत तंबूत परतला होता. कर्णधार निगर सुल्ताना ( ३८) वगळल्यास बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. ८६ धावा असताना निगर बाद झाली आणि त्यानंतर पुढील २ धावांत ५ विकेट्स पडल्या. १२ चेंडूंत १४ धावांची गरज असताना दीप्ती शर्माने १९व्या षटकात केवळ चार धावा दिल्या अन् निगरची विकेट घेतली. त्यानंतर ६ चेंडूंत १० धावा असताना शेफाली गोलंदाजीला आली अन् तिने २ धावा देत ४ विकेट्स मिळवून दिल्या. यातील एक विकेट रन आऊट होती. बांगलादेशचा संपूर्ण संघ ८७ धावांत माघारी परतला. 
 

Web Title: 5 wickets in 2 runs! IND vs BAN :  W+1, W, 0, W, 0, W by Shafali Verma in the final over while defending just 10 runs, India defended 95 runs in the 2nd T20I & won the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.