Join us

Happy Birthday Ganguly: 49 चा झाला 'दादा'; क्रिकेटऐवजी "या" खेळात करायचे होते गांगुलीला करियर

Happy Birthday Ganguly: गांगुलीला क्रिकेटपटू बनवण्यात त्याचे वडील चंडीदास गांगुली यांचे मोठे योगदान होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 13:22 IST

Open in App
ठळक मुद्दे वन-डे क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाज अशी ओळख ओपनिंग बॅट्समन करण्यात मदनलाल यांचा वाटा

मुंबई: 'दादा' नावाने ओळखला जाणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आज 49 वर्षांचा झाला आहे. सौरव गांगुली आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. पण, तुम्हाला माहित आहे का ? गांगुलीला मुळात क्रिकेटमध्ये करिअर करायचेच नव्हते. 

एका मुलाखतीदरम्यान गांगुलीने सांगितले की, त्याला क्रिकेटमध्ये रस नव्हता. त्याला फुटबॉलमध्ये करिअर करायचे होते. पण, योगायोगाने तो क्रिकेटर बनला. खरतर गांगुलीला क्रिकेटपटू बनवण्यात त्याचे वडील चंडीदास गांगुली यांचे मोठे योगदान होते. चंडीदास तेव्हा पश्चिम बंगाल क्रिकेट बोर्डाचे सदस्य होते. मुलाखतीत गांगुलीने सांगितले की, 'मला लहानपणापासून फुटबॉलची आवड होती. शाळेत असताना मी फुटबॉल खुप चांगल्याप्रकारे खेळायचो. पण, एका उन्हाळ्याच्या सुट्टीत वडिलांनी मला क्रिकेट अकादमीमध्ये टाकले. तेव्हापासून मी फुटबॉलपासून दूर गेलो आणि क्रिकेटच माझी ओळख बनली.'

ओपनिंग बॅट्समन करण्यात मदनलाल यांचा वाटावयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण, पहिल्याच वन-डेमध्ये अवघ्या 3 धावांवर तो आऊट झाला. त्यानंतर चार वर्षे संघात स्थान मिळाले नाही. पण, 1996 साली त्याचे टीममध्ये पुनरागमन झाले आणि इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन टेस्टमध्येच त्याने शतक झळकावले. त्यावेळेस गांगुली मिडल ऑर्डरमध्ये बॅटींग करत असे. त्याला ओपनिंग बॅट्समन करण्यात तेव्हाचे प्रशिक्षक मदनलाल यांचा वाटा होता.

टॅग्स :गुन्हेगारीसौरभ गांगुलीबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ