IND vs SA, 2nd T20I, Gautam Gambhir Left Fuming As India Star Arshdeep Singh Watch Video : आंतरराष्ट्रीय टी-२० मधील भारतीय संघाचा नंबर वन गोलंदाज असलेला अर्शदीप सिंग दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात चांगलाच महागडा ठरला. या सामन्यात त्याने १३ चेंडूची एक षटक टाकली. या षटकात ७ वाइड चेंडूसह त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अवांतर धावा तर दिल्या. एवढेच नाही तर या खराब गोलंदाजीच्या जोरावर त्याच्या नावे लाजिरवण्या विक्रमाची नोंद झाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एका षटकात सर्वाधिक चेंडू टाकत अर्शदीपच्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील ११ व्या षटकात क्विंटन डी कॉकनं पहिल्याच चेंडूवर अर्शदीपला षटकार मारला. त्यानंतर दबावात अर्शदीप सिंगनं सलग दोन चेंडू वाइड टाकले. एक चेंडू निर्धाव टाकल्यावर त्याने या षटकात पाच चेंडू वाइड टाकले. १३ चेंडूच्या षटकात ७ वाइड चेंडू टाकत त्याने १८ धावा खर्च केल्या. यासह आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वाधिक मोठे षटक टाकण्याचा लाजिरावणा विक्रम त्याच्या नावे झाला.
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; डगआउटमध्ये गंभीर संतापला! इथं पाहा व्हायरल व्हि़डिओ
२०२४ मध्ये अफगाणिस्तानच्या नवीन उल हक याने झिम्बाब्वेविरुद्धच्या हरारेच्या मैदानातील टी-२० सामन्यात एका षटकात सर्वाधिक १३ चेंडू टाकले होते. आता अर्शदीपनं त्याच्या लाजिरवाण्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याची खराब गोलंदाजी पाहून भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर संतापल्याचे पाहायला मिळाले. अर्शदीपच्या लांबलचक षटकाच्या वेळी डग आउटमध्ये कोचची प्रतिक्रिया बघण्याजोगी होती. सोशल मीडियावर गंभीरची रिअॅक्शन व्हायरल होताना दिसत आहे.
महागडे षटक; सर्वाधिक वाइड चेंडू टाकण्याचाही नकोसा रेकॉर्ड
अर्शदीप हा भारतीय टी-२० संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. घरच्या मैदानात त्याचाकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा होती. पण तो संघाकडून सर्वात महागडा गोलंदाज ठरला. ४ षटकांच्या कोट्यात एकही विकेट न घेता त्याने ५४ धावा खर्च केल्या, वाइडच्या रुपात त्याने ९ अवांतर धावा खर्च केल्या. एका षटकात भारताकडून सर्वाधिक वाइड चेंडूचा नकोसा रेकॉर्ड त्याच्या नावे झाला आहे.