Join us

Pat cummins:वडील झाल्याच्या १० महिन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स विवाहबंधनात 

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स विवाहबंधनात अडकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 18:41 IST

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) विवाहबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे पिता झाल्याच्या १० महिन्यानंतर पॅट कमिन्सने लग्न केले आहे. त्याची गर्लफ्रेंड बेकी बॉस्टन सोबत शुक्रवारी क्वीन्स लॅंडच्या बायरन बे मध्ये हा विवाह सोहळा पार पडला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. आपल्या कसोटी संघाच्या कर्णधाराच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी ऑस्ट्रेलियातील दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते. 

पॅट कमिन्स आणि बेकी बॉस्टन विवाहबंधनात दरम्यान, पॅट कमिन्स आणि बेकी बॉस्टन  (Becky Boston) यांनी मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला. मुलाला जन्म दिल्यानंतर १० महिन्यांनी त्यांनी लग्न केले आहे. पॅट कमिन्स आणि बेकी बॉस्टन मागील वर्षीच लग्न करणार होते मात्र कोरोनामुळे ते होऊ शकले नाही. बॉस्टन आणि कमिन्स मागच्या ९ वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून रिलेशनशिपमध्ये होते. २०१३ पासून एकमेकांच्या प्रेमात असलेले हे कपल आजच्या घडीला आयुष्यभरासाठी एकमेकांचे झाले आहे. 

साखरपुडा झाल्यानंतर २ वर्षांनी केले लग्न एक घातक गोलंदाज म्हणून पॅट कमिन्सची जगभर ख्याती आहे. बेकी बॉस्टन ब्रिटनची रहिवाशी असून ती पेशाने बेकी इंटिरियर आहे. तिचे ऑनलाइन स्टोर देखील आहे. दोघांच्या लग्नाला ऑस्ट्रेलियातील दिग्गज क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती, यामध्ये मिचेल स्टार्क, टिम पेन आणि नॅथन लायन या खेळाडूंचा समावेश होता. सर्वप्रथम कमिन्सने बॉस्टनला प्रपोज केले होते, २०२० मध्ये साखरपुडा पार पडल्यानंतर २ वर्षांनी त्यांनी लग्न केले. कमिन्सचा मित्र नॅथन लायनने त्याचे दुसरे लग्न २४ जुलै रोजी केले होते. त्याला त्याच्या पहिल्या पत्नीकडून २ अपत्ये आहेत. 

 

टॅग्स :आॅस्ट्रेलियालग्नव्हायरल फोटोज्आंतरराष्ट्रीय क्रिकेटइन्स्टाग्राम
Open in App