MI vs RCB Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातला सामना चुरशीचा झाला. इशान किशन आणि किरॉन पोलार्ड यांनी MIच्या हातून निसटलेला सामना खेचून आणला. पण, अखेरच्या चेंडूवरील चौकारानं सामन्यात बरोबरी झाली आणि सुपर ओव्हरचा थरार रंगला. त्यात RCB वरचढ ठऱले.

MI vs RCB Latest News & Live Score :

-

सुपर ओव्हरचा थरार
नवदीप सैनी गोलंदाजीला/ हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड फलंदाजीला
पहिला चेंडू - 1 धाव ( पोलार्ड)
दुसरा चेंडू - 1 धाव ( हार्दिक)
तिसरा चेंडू - 0 धाव ( पोलार्ड)
चौथा चेंडू - चौकार ( पोलार्ड)
पाचवा चेंडू - OUT ( पोलार्ड ) 
सहावा चेंडू - 1 बाय धावा ( हार्दिक) 

जसप्रीत बुमराह गोलंदाजी/ एबी डिव्हिलियर्स व विराट कोहली फलंदाजीला
पहिला चेंडू - 1 धाव ( एबी) 
दुसरा चेंडू - 1 धाव ( विराट) 
तिसरा चेंडू - o धाव ( एबी) 
चौथा चेंडू - चौकार ( एबी) 
पाचवा चेंडू - 1 धाव ( एबी)
सहावा चेंडू - चौकार ( विराट) 

-मुंबईला 6 चेंडूंत 19 धावा हव्या होत्या. पहिल्या दोन चेंडूंवर प्रत्येकी एक धाव आल्यानंतर इशाननं तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. चौथ्या चेंडूवरही त्याचीच पुनरावृत्ती केली. पण, पाचव्या चेंडूवर इशान सीमारेषेवर झेलबाद झाला. इशान 58 चेंडूंत 2 चौकार व 9 षटकार खेचून 99 धावांवर माघारी परतला. पोलार्डनं अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावा हव्या असताना चौकार खेचला व सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. 

पोलार्डचा हा झंझावात पुढीत षटकात कायम राहिला. युजवेंद्रचे त्यानं खणखणीत षटकारानं स्वागत केलं. 18व्या षटकात पोलार्डनं 6, 2, 1, 6 (इशान किशन), 1, 6 अशा 22 धावा चोपल्या. या षटकासह पोलार्डनं 20 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.  त्यामुळे अखेरच्या 12 चेंडूंत मुंबईला 31 धावा हव्या होत्या. 


 

पोलार्डचा हा झंझावात पुढीत षटकात कायम राहिला. युजवेंद्रचे त्यानं खणखणीत षटकारानं स्वागत केलं. 18व्या षटकात पोलार्डनं 6, 2, 1, 6 (इशान किशन), 1, 6 अशा 22 धावा चोपल्या. त्यामुळे अखेरच्या 12 चेंडूंत मुंबईला 31 धावा हव्या होत्या. 

- हार्दिक पांड्याकडून ( Hardik Pandya) मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु अॅडम झम्पानं ( Adam Zampa) त्याला 15 धावांवर माघारी पाठवले. IPL 2020त पहिलाच सामना खेळणाऱ्या इशान किशननं ( Ishan Kishan) 39 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. MIला अखेरच्या 5 षटकांत विजयासाठी 90 धावांची गरज होती. इशान त्याच्या बाजूनं जोरदार प्रयत्न करत होता. पण, पोलार्डची बॅट मंदावलेली दिसली. 17व्या षटकात पवन नेगीनं सीमारेषेवर पोलार्डचा झेल सोडला आणि तो RCBला भारी पडेल असेच चिन्ह दिसू लागली होती. अॅडम झम्पानं टाकलेल्या 18व्या षटकात पोलार्डनं 4, 6, 6, 2, 6, 3 अशा 27 धावा चोपल्या. अखेरच्या चेंडूवर युजवेंद्र चहलनं पोलार्डचा झेल सोडला. 

Image

MI ला पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 बाद 35 धावांवर समाधान मानावे लागले. क्विंटन डी कॉकही ( 14) स्वस्तात माघारी परतला. युजवेंद्र चहलनं त्याच्या पहिल्याच षटकात MIला धक्का दिला. 

लक्ष्याचा पाठलाग करताना MIला आक्रमक सुरुवात करून देणे अपेक्षित होते. रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या षटकात दहा धावा केल्या. पण, दुसऱ्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरनं MIला मोठा धक्का दिला. पवन नेगीनं त्याचा ( 8) झेल टिपला अन् विराट कोहलीनं जल्लोष साजरा केला. इसुरू उडानानं ( Isaru Udana) तिसऱ्या षटकात मुंबईला आणखी एक धक्का दिला. सुर्यकुमार यादव ( 0) बाद झाला, एबीनं यष्टिंमागे त्याचा सुरेख झेल टिपला. 
 

- RCBच्या आरोन फिंच ( Aaron Finch), देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) आणि एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यांनी अर्धशतकं झळकावली. शिवम दुबेनं ( Shivam Dube) अखेरच्या षटकात तीन खणखणीत षटकार खेचून RCBला मोठा पल्ला गाठून दिला. 

14व्या षटकात देवदत्त पडीक्कलने MIचा गोलंदाज जेम्स पॅटिसन्स ( James Pattinson ) याला सलग दोन षटकार खेचून RCBला शतकी पल्ला पार करून दिला. देवदत्तनं 16व्या षटकात किरॉन पोलार्डला खणखणीत चौकार मारून अर्धशतक पूर्ण केले. 37 चेंडूंत त्यानं हे अर्धशतक पूर्ण केलं. तिसऱ्या सामन्यातील त्याचे हे दुसरे अर्धशतक ठरले. 

- विराट कोहलीचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. राहुल चहरच्या गुगलीवर विराट ( 3) रोहित शर्माच्या हाती सोपा झेल देऊन माघारी परतला. 

Image

9व्या षठकात ट्रेंट बोल्टनं RCBला पहिला धक्का दिला. फिंच 35 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 52 धावा केल्या. 

-

- राहुल चहरनं पाचवं षटक टाकलं आणि फिंचनं त्यावर 14 धावा कुटल्या. RCBनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद 59 धावा केल्या. फिंचनं 31 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 

-  राहुल चहरनं पाचवं षटक टाकलं आणि फिंचनं त्यावर 14 धावा कुटल्या. RCBनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद 59 धावा केल्या 

आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) यांनी सावध सुरुवात केली. दुसऱ्या व तिसऱ्या षटकात फिंचला अनुक्रमे कृणाल पांड्या व रोहित शर्मा यांनी जीवदान दिले. कृणालसाठी झेल थोडासा अवघड होता, परंतु ट्रेंट बोल्टनं टाकलेल्या तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मिडविकेटला रोहित शर्मानं फिंचचा झेल सोडला. फिंच तेव्हा अवघ्या 10 धावांवर होता. 

- विराट कोहलीनं मोठा डाव खेळला; रोहित शर्माला बाद करणाऱ्या खेळाडूला संधी दिली

- MIच्या ताफ्यात सौरभ तिवारीच्या जागी इशान किशन याला संधी दिली आहे
MI Playing XI: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल चहर, जेम्स पॅटिन्सन, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

Image
- अॅडम झम्पा, इसुरू उडाना यांना संधी
RCB Playing XI: देवदत्त पडीक्कल, आरोन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरकिरत सिंग मान, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल, अॅडम झम्पा, इसुरू उडाना 

Image

आजच्या सामन्यात झम्पा आणि इसुरू उदाना यांना पदार्पणाची संधी मिळणार आहे.  

Image

संजू सॅमसनची मैदानावर आतषबाजी...पण, त्याच्यावरून गौतम गंभीर-शशी थरूर यांच्यात रंगली जुगलबंदी

संजू सॅमसनचा डाएट प्लान कुणी मला सांगेल का? आनंद महिंद्रा यांचं ट्विट व्हायरल 

राहुल टेवाटियाचे एका षटकात पाच खणखणीत Six; ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी, Video 

राजस्थान रॉयल्सच्या ऐतिहासिक विजयानंतर Point Tableमध्ये मोठे फेरबदल!

हक्कासाठी जाब विचारणाऱ्या राहुल टेवाटियाची IPL 2019 मध्ये रिकी पाँटिंगनं केली होती थट्टा, Video

 संजू सॅमसनला टीम इंडियात स्थान मिळत नाही, ही आश्चर्याची गोष्ट; शेन वॉर्ननं व्यक्त केली खंत 

मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं


दुबईच्या मैदानावरील दोन्ही संघांची कामगिरी 
मुंबई इंडियन्स - सामने - 3, पराभव - 3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - सामने -4, विजय -2, पराभव -2
 
आज कोणते विक्रम तुटणार 
- IPLमध्ये 5000 धावा पूर्ण करण्यासाठी रोहित शर्माला 10 धावांची गरज आहे. तसेच MIसाठी 150 षटकार पूर्ण करण्यासाठी त्याला एक Six हवा आहे
- विराट कोहलीला IPL मध्ये 5500 धावांचा पल्ला गाठण्यासाठी 73 धावा हव्या आहेत आणि IPLमध्ये षटकारांचे द्विशतक पूर्ण करण्यासाठी 10 Six हवे आहेत.
- एबी डिव्हिलियर्सलाही IPLमध्ये 4500 धावा गाठण्यासाठी 26 धावांची गरज आहे
- सूर्यकुमार यादवने 2 षटकार मारल्यास त्याचे IPLमधील षटकारांचे अर्धशतक पूर्ण होईल

 

English summary :
MI vs RCB Live Score Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore IPL 2020 Live Score and Match updates

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MI vs RCB Live Score Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore IPL 2020 Live Score and Match updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.