MI vs RCB Latest News : विराट कोहलीनं मोठा डाव खेळला; रोहित शर्माला बाद करणाऱ्या खेळाडूला संधी दिली

MI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. 

By स्वदेश घाणेकर | Published: September 28, 2020 07:09 PM2020-09-28T19:09:47+5:302020-09-28T19:16:31+5:30

whatsapp join usJoin us
MI vs RCB Latest News : Adam Zampa and Isuru Udana are all set to make their debut for Royal Challengers Bangalore | MI vs RCB Latest News : विराट कोहलीनं मोठा डाव खेळला; रोहित शर्माला बाद करणाऱ्या खेळाडूला संधी दिली

MI vs RCB Latest News : विराट कोहलीनं मोठा डाव खेळला; रोहित शर्माला बाद करणाऱ्या खेळाडूला संधी दिली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातला संघर्ष पाहायला मिळणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली ( Virat Kohli) या दोन स्टार खेळाडूंचा खेळही या सामन्यात पाहायला मिळणार असल्यानं सर्वच उत्सुक आहेत. मुंबई इंडियन्सनं ( MI) मागच्या सामन्यात KKRवर विजय मिळवला होता, तर RCBला किंग्स इलेव्हन पंजाबकडून ( KXIP) दारूण पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांचा नेट रन टेर - मध्ये गेला आहे. दोन्ही संघांनी दोन सामन्यांत एका विजयासह खात्यात 2 गुण जमा केले आहेत. MI vs RCB Latest News & Live Score :

- MIच्या ताफ्यात सौरभ तिवारीच्या जागी इशान किशन याला संधी दिली आहे
MI Playing XI: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल चहर, जेम्स पॅटिन्सन, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

- अॅडम झम्पा, इसुरू उडाना यांना संधी
RCB Playing XI: देवदत्त पडीक्कल, आरोन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरकिरत सिंग मान, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल, अॅडम झम्पा, इसुरू उडाना 


दुबईच्या मैदानावरील दोन्ही संघांची कामगिरी 
मुंबई इंडियन्स - सामने - 3, पराभव - 3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - सामने -4, विजय -2, पराभव -2
 
आज कोणते विक्रम तुटणार 
- IPLमध्ये 5000 धावा पूर्ण करण्यासाठी रोहित शर्माला 10 धावांची गरज आहे. तसेच MIसाठी 150 षटकार पूर्ण करण्यासाठी त्याला एक Six हवा आहे
- विराट कोहलीला IPL मध्ये 5500 धावांचा पल्ला गाठण्यासाठी 73 धावा हव्या आहेत आणि IPLमध्ये षटकारांचे द्विशतक पूर्ण करण्यासाठी 10 Six हवे आहेत.
- एबी डिव्हिलियर्सलाही IPLमध्ये 4500 धावा गाठण्यासाठी 26 धावांची गरज आहे
- सूर्यकुमार यादवने 2 षटकार मारल्यास त्याचे IPLमधील षटकारांचे अर्धशतक पूर्ण होईल
आयपीएलला सुरू होण्यापूर्वीच RCBचा गोलंदाज केन रिचर्डसन यानं माघार घेतल्याचे जाहीर केलं. तो बाप होणार आहे आणि अशावेळी त्यानं पत्नीसोबत राहण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे रिचर्डसनला बदली खेळाडू कोण, याची सर्वांना उत्सुकता होती. रिचर्डसननं 14 आयपीएल सामन्यांत 18 विकेट्स घेतल्या आहेत.  RCBनं रिचर्डसनच्या जागी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पा याची निवड केली. झम्पानं आयपीएलच्या 11 सामन्यांत 7.55च्या इकॉनॉमी रेटनं 19 विकेट्स घेतल्या आहेत. यूएईच्या वातावरणात येथील खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देणारी आहे, त्यामुळे RCBची ताकद वाढली आहे.  
आजच्या सामन्यात झम्पा आणि इसुरू उदाना यांना पदार्पणाची संधी मिळाली आहे. सामन्यापूर्वी या दोघांना RCBची कॅप देण्यात आली. झम्पा आणि रोहित यांच्यातील सामन्यात 9 चेंडूंत दोन वेळा रोहितला बाद केले आहे. 

Web Title: MI vs RCB Latest News : Adam Zampa and Isuru Udana are all set to make their debut for Royal Challengers Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.