MI vs CSK Live Score Mumbai Indians vs Chennai Super Kings IPL 2020 Live Score and Match updates | MI vs CSK : चेन्नई सुपर किंग्सची विजयी सलामी, रायुडू-फॅफची फटकेबाजी

MI vs CSK : चेन्नई सुपर किंग्सची विजयी सलामी, रायुडू-फॅफची फटकेबाजी

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super kings) यांच्यातल्या IPL 2020तील पहिल्या सामन्यात चांगली चुरस पाहायला मिळाली. पहिल्या डावात सामन्याचे पारडे दोन्ही संघांच्या पारड्यात झुलते राहिले. कधी मुंबई वरचढ होताना दिसला, तर कधी चेन्नई... पण, CSKच्या गोलंदाजांनी अखेरच्या 6 षटकांत MIच्या सहा फलंदाजांना माघारी पाठवून धावगतीवर लगाम लावली. त्यानंतर पहिल्या दोन षटकांत CSKचे दोन फलंदाज माघारी पाठवल्यानंतर MI थोडेसे निश्चिंत झाले. त्यामुळे त्यांच्याकडून क्षेत्ररक्षणात चूका केल्या आणि त्याचा भुर्डंद त्यांना सहन करावा लागला. अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf Du Plessis) यांनी शतकी भागीदारी करून CSKचा डाव सावरला.  

MI vs CSK Live Score Updates :

- अंबाती रायुडू बाद झाल्यावर फलंदाजीला रवींद्र जडेजा आला. तोही 10 धावा करून माघारी परतला. त्यानंतर MS Dhoni येईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण, धोनीनं सॅम कुरनला पाठवले. धोनीला खेळपट्टीवर लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन ठेवायचे होते आणि त्यामुळे त्यानं कुरनला पाठवले. कुरन 5 चेंडूंत दहा धावा करून माघारी परतला अन् धोनी मैदानावर आला. फॅफने 42 धावांत अर्धशतक पूर्ण केले. दीड वर्षानंतर मैदानावर उतलेल्या धोनीला पहिल्याच चेंडूंवर पंचांनी बाद दिले. पण,  DRSघेत धोनीनं पंचांना निर्णय बदलण्यास भाग पाडले. अखेरच्या षटकात विजयासाठी 5 धावांची गरज असताना फॅफनं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला. पुढच्या चेंडूवर चौकार खेचून फॅफनं CSKला 5 विकेट्स राखून विजय मिळवून दिला. 

सलग दोन धक्क्यानंतर अंबाती रायुडू व फॅफ डू प्लेसिसनं CSKचा डाव सावरला. रायुडूनं 33 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

- धावांचा पाठलाग करताना CSKचे दोन्ही सलामीवीर पहिल्या दोन षटकांत माघारी परतले. शेन वॉटसन ( 4) आणि मुरली विजय ( 1) यांना अनुक्रमे ट्रेंट बोल्ट व जेम्स पॅटिन्सन यांनी पायचीत केले. मुरलीनं ( Murali Vijay) ने DRS घेतला असता तर त्याची विकेट वाचली असती. DRS reviweमध्ये चेंडू तिसऱ्या स्टम्पच्या बाजूनं जात असल्याचे दिसत होते. त्यानंतर अंबाती रायुडू व फॅफ डू प्लेसिस यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात ढिसाळपणाही दाखवला. 

- टी-20 सामन्यांमध्ये 250 गडी बाद करण्यात योगदान देणारा धोनी पहिला यष्टीरक्षक ठरला. त्याने पोलार्ड व कृणाल पांड्याचे झेल घेतले.

- पियुष चावला ह्याने किंग्ज ईलेव्हन, कोलकाता नाईट रायडर्स आणि आता चेन्नई सुपर किंग्ज या संघांकडून खेळताना तिन्ही वेळा आपली पहिली विकेट  मुंबई इंडियन्सविरुध्दच घेतली आहे.

 मुंबई इंडियन्स इथे गमावली सामन्यावरील पकड; जाणून घ्या टर्निंग पॉईंट

- ट्रेट बोल्ट आणि जेम्स पॅटिनसन यांनी CSKला दोन मोठे धक्के दिले.

- धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सला पहिल्याच षटकात धक्का बसला, शेन वॉटसन 4 धावा करून ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला.

- लुंगी एनगिडीचे सर्वाधिक तीन विकेट्स

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super kings) यांच्यातल्या IPL 2020तील पहिल्या सामन्यात चांगली चुरस पाहायला मिळाली. पहिल्या चार षटकांत सामना MIच्या पारड्यात होता, पण पाचव्या षटकात दोन्ही सलामीवीर परतले. त्यानंतर सौरभ तिवारीनं खिंड लढवली, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांनी फटकेबाजी केली. पण, पुन्हा CSKनं सामन्यात कमबॅक केले आणि मुंबईला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. 
 

कृणाल पांड्या ( Krunal Pandya) आणि किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) हे मोठी खेळी करतील अशी अपेक्षा होती. पण, चेन्नईच्या गोलंदाजांनी त्यांना यश मिळवू दिले नाही.  

 15व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजानं त्याला बाद केलं. फॅफ ड्यू प्लेसिसनं ( Faf  du Plessis ) सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. तिवारी 31 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार मारून 42 धावांत बाद झाला. त्याच षटकात फॅफनं आणखी एक सुरेख झेल टिपून हार्दिक पांड्याला माघारी पाठवले. हार्दिकने 14 धावा केल्या.

-रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी'कॉक ( Q de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला साजेशी सुरुवात करून दिली. न्यूझीलंड दौऱ्यानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या रोहितनं CSK गोलंदाज दीपक चहर याचं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून स्वागत केलं. इतक्या दिवसांनी बॅटवर हात साफ करण्याची संधी रोहित या सामन्यात सोडणार नाही, त्याची फटकेबाजी पाहून असेच वाटत होते. पण, महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) चतुर नेतृत्वानं सामन्यात रंगत आणली. धोनीनं पाचवं षटक पीयूष चावलाला ( Piyush Chawla) पाचारण केलं आणि त्याच्या गुगलीसमोर रोहित फसला. तो सॅम कुरनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. रोहितला 10 चेंडूंत 2 चौकारांसह 12 धावाच करता आल्या. 

पुढील षटकात क्विंटनही बाद झाला. यावेळी कुरनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात तो शेन वॉटसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. क्विंटनने 20 चेंडूंत 5 चौकारांसह 33 धावा केल्या. मुंबई इंडियन्सचे ( MI) दोन्ही सलामीवीर 48 धावांत माघारी परतल्यानंतर CSK सामन्यात कमबॅक करण्याच्या तयारीत होते, पण, सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी MI चा डाव सावरला. 

- क्विंटन डी'कॉकही गेला माघारी, सॅम कुरननं मिळवून दिले यश

- 5 षटकांत मुंबई इंडियन्सच्य ( MI) 1 बाद 48 धावा, रोहित शर्मा ( Rohit Sharma) 12 धावा करून माघारी

 

- आयपीएलच्या पहिल्याच षटकात 2013 नंतर दोन चौकार प्रथमच लागले.

- दीपक चहर सलग तीन आयपीएलमध्ये पहिले षटक टकणारा गोलंदाज ठरला. असा तो एकमेव गोलंदाज आहे.

-रोहित शर्माने तिसऱ्यांदा आयपीएलच्या सत्राची सर्वात पहिली धाव घेतली. याआधी 2015 व 2018 च्या आयपीएलची पहीली धाव त्यानेच घेतली होती.

पहिल्या षटकात निघालेल्या 12 धावा ह्या आयपीएलच्या सलामी सामन्यात आतापर्यंत निघालेल्या सार्वाधिक धावा आहेत. याआधी 2013 च्या सलामी सामन्यात 9 धावा निघाल्या होत्या.

IPL 2020 MI vs CSK Latest News:  मुंबई इंडियन्सच्या संघात दोन खेळाडूंचे पदार्पण, सौरभ तिवारीचे पुनरागमन

-

-

रोहित शर्मा, ख्रिस लीन की क्विंटन डी'कॉक; यापैकी सलामीला कोण येणार? MIने दूर केला सस्पेन्स 

- KKR संघाचा मालक शाहरूख खान यानं दिल्या शुभेच्छा

- पहिल्या सामन्यासाठी स्टेडियम सज्ज

- संभाव्य संघ यातून निवडणार

चेन्नई सुपर किंग्स Chennai Super Kings Players List (CSK) - महेंद्रसिंग धोनी, फॅफ ड्यु प्लेसिस, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, मुरली विजय, रुतुराज गायकवाड,  इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला, जोश हेझलवूड, किशोरे, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, सॅम कुरण, नारायणन जगदीसन 

मुंबई इंडियन्स Mumbai Indians Players List (MI)  - रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या,  इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.
 

- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह हेही स्टेडियममध्ये दाखल

सलामीच्या सामन्यासाठी दोन्ही संघ शेख जायेद क्रिकेट स्टेडियमवर दाखल

पाहा व्हिडीओ...

-  वेदर रिपोर्ट । येथे तापमान ३७ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. यामुळे भीषण गर्मी आणि उकाडा असेल. आकाश निरभ्र राहणार असल्याने पावसाची शक्यता नाही.

- पीच रिपोर्ट । येथे खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक मानली जात आहे. तसेच फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता. मैदान फार मोठे असल्यामुळे फलंदाज फिरकीविरुद्ध धोका पत्करणार नाहीत. मध्यम वेगवान मारा उपयुक्त ठरू शकतो. मोठी फटकेबाजी टाळून एक किंवा दोन धावांवर अधिक भर द्यावा लागेल.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

अबुधाबीच्या बॉलिंग पीचवर ‘हा’ ठरु शकतो मुंबईचा हुकमी एक्का

सचिन तेंडुलकर सांगतोय, या दोन खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्स आणखी ताकदवान झाला!

मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'

मुंबई इंडियन्स यंदाही जेतेपद पटकावणार? Rohit Sharmaच्या संघाला सट्टेबाजांची पसंती

10, 464 तास, 62 आठवडे अन् 436 दिवस... MS Dhoni आज साधणार अचूक वेळ! 

Read in English

English summary :
MI vs CSK Live Score Mumbai Indians vs Chennai Super Kings IPL 2020 Live Score and Match updates

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MI vs CSK Live Score Mumbai Indians vs Chennai Super Kings IPL 2020 Live Score and Match updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.