IPL 2020 MI vs CSK Latest News : अबुधाबीच्या बॉलिंग पीचवर ‘हा’ ठरु शकतो मुंबईचा हुकमी एक्का

IPL 2020 MI vs CSK Latest News : अबु धाबी येथे झालेल्या T10लीगमध्ये त्याने पाडला होता धावांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 05:36 PM2020-09-19T17:36:57+5:302020-09-19T17:41:56+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 MI vs CSK Latest News: Chris lynn could be key player for Mumbai Indians's in IPL 2020 | IPL 2020 MI vs CSK Latest News : अबुधाबीच्या बॉलिंग पीचवर ‘हा’ ठरु शकतो मुंबईचा हुकमी एक्का

IPL 2020 MI vs CSK Latest News : अबुधाबीच्या बॉलिंग पीचवर ‘हा’ ठरु शकतो मुंबईचा हुकमी एक्का

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : यंदाच्या आयपीएलला अखेर यूएईमध्ये शनिवारपासून सुरुवात होत आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी चौकार-षटकारांचा पाऊस पडणार की नाही, असाही प्रश्न सतावत आहे. याचे कारण म्हणजे यूएईमध्ये असलेले संथ खेळपट्ट्या.  ( IPL 2020 Live Updates, Click here

सचिन तेंडुलकर सांगतोय, या दोन खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्स आणखी ताकदवान झाला!

यूएईमध्ये कायमच संथ खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे अनेकदा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्चस्व गाजवणारे फलंदाज फ्लॉप ठरल्याचे दिसले आहे. आता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज या पहिल्या सामन्यातही फिरकीपटूंचेच वर्चस्व राहण्याचे चित्र दिसत आहेत. दोन्ही संघांमध्ये एकाहून एक आक्रमक फलंदाजांचा समावेश आहे. परंतु, खेळपट्टीचे स्वरुप पाहता कोणता फलंदाज छाप पाडणार हाच प्रश्न आहे. ( IPL 2020 Live Updates, Click here

असे असले, तरी मुबई इंडियन्सला मात्र येथील संथ खेळपट्ट्यांची फारशी चिंता वाटणार नाही. कारण त्यांच्याकडे असा धडाकेबाज फलंदाज आहे, ज्याने अबुधाबीतील खेळपट्टीवर सातत्याने तुफानी फटकेबाजी केली आहे. त्यामुळेच आता चेन्नईच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा धडाकेबाज फलंदाज आहे ख्रिस लिन.

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) लिन फ्लॉप ठरला. मात्र अबुधाबीमधील त्याचा शानदार रेकॉर्ड पाहता मुंबईच्या संघात आनंदाचे वातावरण आहे. अबुधाबीमध्ये वेगाने धावा काढणे सोपे काम नाही, मात्र लिन त्यास अपवाद आहे. त्याने आतापर्यंत अबुधाबीच्या खेळपट्टीवर ३१ षटकारांच्या सहाय्याने ३७१ धाव कुटल्या आहेत. गेल्या वर्षी येथे झालेल्या टी-१० लीग स्पर्धेत लिनने धुमाकुळ घातला होता. त्याने आपल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर सर्वच गोलंदाजांना धुतले होते. त्यामुळे टी-१० लीगमधील अनुभवाच्या जोरावर लिनकडे धोकादायक फलंदाज म्हणून पाहिले जात आहे.  ( IPL 2020 Live Updates, Click here

गेल्या वर्षी अबुधाबी टी-१० स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावताना लिनने ३७१ धावा काढल्या होत्या. विशेष म्हणजे त्याने अवघ्या ३० चेंडूंत ९१ धावा कुटताना आपली सर्वोत्तम खेळी केली होती. याच धमाकेदार कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा विश्वासही लिनने व्यक्त केला आहे. तसेच, मुंबई इंडियन्सने आयोजित केलेल्या सराव सामन्यांमध्येही लिनने हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराहविरुद्ध काही आक्रमक फटके खेळताना आपला फॉर्म सिद्ध केला.

मुंबई इंडियन्सचे फॅन आहात, मग या गोष्टी माहित असायलाच हव्यात
इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात महागड्या (most expensive ) संघाचा मान मुंबई इंडियन्सला ( MI) जातो. Reliance groupने 826 कोटी 12 लाख 99,200 रुपयांत ही फ्रँचायझी घेतली. उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या ह्या संघाच्या मालकिण आहेत.

IPLच्या पहिल्या व दुसऱ्या पर्वात सर्वाधिक पाहिला गेलेल्या संघांचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. एकूण 239 मिलियन व्ह्यूअर्स या संघाला मिळाले होते.

मुंबई इंडियन्स हा IPL मधील सर्वात यशस्वी संघ आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. MI ने 2013, 2015, 2017 आणि 2019मध्ये जेतेपद पटकावले आहे. पण, यासह त्यांच्या नावावर चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 ( 2011) चेही जेतेपद आहे.

कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) हे मुंबई इंडियन्सचे फेव्हरिट प्रतिस्पर्धी आहेत. KKR विरुद्ध MIची विजयाची टक्केवारीह ही 76 इतकी आहे. MIने 25 पैकी 19 सामन्यांत विजय मिळवला, तर 6 सामने पराभूत झाले.

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) या संघांनं MIविरुद्ध सर्वाधिक यश मिळवले आहेत. 14 पैकी 7 सामने मुंबईने गमावले आहेत, तर 1 सामना बरोबरीत सुटला होता.

सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवणाऱ्या तीन संघांमध्ये ( KXIP व RR) मुंबई इंडियन्सचा समावेश आहे. मुंबईनं दोन वेळा सुपर ओव्हर खेळली आणि दोन्ही वेळेस त्यांनी विजय मिळवला.

IPLमध्ये सर्वाधिक 1035 विकेट्स घेणारा मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे. आतापर्यंत एकही संघाला 1000 विकेट्सचा पल्ला गाठता आलेला नाही.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी IPL मध्ये सर्वाधिक 34 षटकं निर्धाव टाकली आहेत. IPLमधील नकोसा विक्रमही MIच्या नावावर आहेत. त्यांनी सर्वाधिक 104 नो बॉल टाकण्याचा विक्रम केला आहे.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या नावावर चार वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम आहे. इतरांच्या तुलनेत ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

IPLमध्ये नियमानुसार अंतिम 11मध्ये चार खेळाडूच खेळू शकतात, परंतु 2011मध्ये मुंबई इंडियन्सचे पाच परदेशी खेळाडू खेळवले होते. संघातील बरेच भारतीच खेळाडू दुखापतग्रस्त होते.

मुंबई इंडियन्सचा गोलंदाज लसिथ मलिंगा याच्या नावावर सर्वाधिक 170 विकेट्स आहेत. त्याने एकदा पाच विकेट्स, तर सहावेळा चार विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

UAEत मुंबईची कामगिरी निराशाजनक झालेली आहे. 2014मध्ये इथे खेळलेल्या पाचही सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली.

मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians Team for IPL 2020) 
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या,  इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.

Web Title: IPL 2020 MI vs CSK Latest News: Chris lynn could be key player for Mumbai Indians's in IPL 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.