IPL 2020 MI vs CSK Latest News : सचिन तेंडुलकर सांगतोय, या दोन खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्स आणखी ताकदवान झाला!

IPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचा फार मोठा चाहतावर्ग आहे. दोन्ही स्पर्धात्मक संघ आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: September 19, 2020 05:24 PM2020-09-19T17:24:55+5:302020-09-19T17:25:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 MI vs CSK Latest News : Sachin Tendulkar,” Mumbai Indians are very strong this time” | IPL 2020 MI vs CSK Latest News : सचिन तेंडुलकर सांगतोय, या दोन खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्स आणखी ताकदवान झाला!

IPL 2020 MI vs CSK Latest News : सचिन तेंडुलकर सांगतोय, या दोन खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्स आणखी ताकदवान झाला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2020 MI vs CSK Latest News :  मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपरकिंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात होणाऱ्या Indian Premier League ( IPL 2020) च्या सलामीच्या लढतीला आता अवघ्या काही तासांचा अवधी राहिला आहे.  गेल्या हंगामात चेन्नईला चारीमुंड्या चीत करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) चेन्नईला थेट आव्हान दिले आहे. आमची तयारी पूर्ण झाली आहे, आता त्यावर अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे, असे सांगत रोहितने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकरनंही यंदाचा MI संघ हा ताकदवान झाला आहे आणि त्याला दोन खेळाडू कारणीभूत असल्याचेही तो म्हणाला.

मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'

मुंबई इंडियन्स यंदाही जेतेपद पटकावणार? Rohit Sharmaच्या संघाला सट्टेबाजांची पसंती

 

सचिन म्हणाला,''ख्रिस लीनची स्फोटक सुरुवात आणि नेथन कोल्टर नायल याची अष्टपैलू कामगिरी यामुळे मुंबई इंडियन्स संघ संतुलित झाला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ आधीपासूनच चांगला होताच, परंतु लीन व कोल्टर नायल यांच्या येण्याचे तो आणखी ताकदवान झाला आहे.'' ( IPL 2020 Live Updates, Click here

''स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संघांमध्ये टशन महत्त्वाची असते. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचा फार मोठा चाहतावर्ग आहे. दोन्ही स्पर्धात्मक संघ आहेत. दोन्ही संघ अखेरच्या क्षणाला सामन्याचा निकाल बदलण्याचा दम राखतात,''असेही सचिन म्हणाला.

10, 464 तास, 62 आठवडे अन् 436 दिवस... MS Dhoni आज साधणार अचूक वेळ! 

IPLचा सलामीचा सामना वाट्याला येणं मुंबई इंडियन्ससाठी तणावाचं, CSKच्या ताफ्यात मात्र आनंद!


 मुंबई इंडियन्सचे फॅन आहात, मग या गोष्टी माहित असायलाच हव्यात
इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात महागड्या (most expensive ) संघाचा मान मुंबई इंडियन्सला ( MI) जातो. Reliance groupने 826 कोटी 12 लाख 99,200 रुपयांत ही फ्रँचायझी घेतली. उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या ह्या संघाच्या मालकिण आहेत.

IPLच्या पहिल्या व दुसऱ्या पर्वात सर्वाधिक पाहिला गेलेल्या संघांचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. एकूण 239 मिलियन व्ह्यूअर्स या संघाला मिळाले होते.

मुंबई इंडियन्स हा IPL मधील सर्वात यशस्वी संघ आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. MI ने 2013, 2015, 2017 आणि 2019मध्ये जेतेपद पटकावले आहे. पण, यासह त्यांच्या नावावर चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 ( 2011) चेही जेतेपद आहे.

कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) हे मुंबई इंडियन्सचे फेव्हरिट प्रतिस्पर्धी आहेत. KKR विरुद्ध MIची विजयाची टक्केवारीह ही 76 इतकी आहे. MIने 25 पैकी 19 सामन्यांत विजय मिळवला, तर 6 सामने पराभूत झाले.

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) या संघांनं MIविरुद्ध सर्वाधिक यश मिळवले आहेत. 14 पैकी 7 सामने मुंबईने गमावले आहेत, तर 1 सामना बरोबरीत सुटला होता.

सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवणाऱ्या तीन संघांमध्ये ( KXIP व RR) मुंबई इंडियन्सचा समावेश आहे. मुंबईनं दोन वेळा सुपर ओव्हर खेळली आणि दोन्ही वेळेस त्यांनी विजय मिळवला.

IPLमध्ये सर्वाधिक 1035 विकेट्स घेणारा मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे. आतापर्यंत एकही संघाला 1000 विकेट्सचा पल्ला गाठता आलेला नाही.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी IPL मध्ये सर्वाधिक 34 षटकं निर्धाव टाकली आहेत. IPLमधील नकोसा विक्रमही MIच्या नावावर आहेत. त्यांनी सर्वाधिक 104 नो बॉल टाकण्याचा विक्रम केला आहे.

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या नावावर चार वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम आहे. इतरांच्या तुलनेत ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

IPLमध्ये नियमानुसार अंतिम 11मध्ये चार खेळाडूच खेळू शकतात, परंतु 2011मध्ये मुंबई इंडियन्सचे पाच परदेशी खेळाडू खेळवले होते. संघातील बरेच भारतीच खेळाडू दुखापतग्रस्त होते.

मुंबई इंडियन्सचा गोलंदाज लसिथ मलिंगा याच्या नावावर सर्वाधिक 170 विकेट्स आहेत. त्याने एकदा पाच विकेट्स, तर सहावेळा चार विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

UAEत मुंबईची कामगिरी निराशाजनक झालेली आहे. 2014मध्ये इथे खेळलेल्या पाचही सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली.

मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians Team for IPL 2020) 
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या,  इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings Players List )

महेंद्रसिंग धोनी, फॅफ ड्यु प्लेसिस, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, मुरली विजय, रुतुराज गायकवाड,  इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला, जोश हेझलवूड, किशोरे, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, सॅम कुरण, नारायणन जगदीसन 

Web Title: IPL 2020 MI vs CSK Latest News : Sachin Tendulkar,” Mumbai Indians are very strong this time”

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.